NSS च्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची  बातमी...

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील एनएनएसच्या १६  हजार ५०० विद्यार्थ्यांना तर शिबिरात सहभागी होणाऱ्या ८  हजार २५०  विद्यार्थ्यांना यामुळे फायदा होणार आहे.

NSS च्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची  बातमी...

 एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

NSS Student : राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत विविध उपक्रमात सहभाग घेणाऱ्या एनएनएसच्या विद्यार्थ्यांच्या (NSS Student) अनुदानाच्या शासनाने वाढ केली आहे. त्यामूळे महाविद्यालयांना (college) एनएनएसचे भरीव अनुदान मिळणार आहे. सुधारित अनुदान प्रति विद्यार्थी  २५०  वरून ४०० रुपये करण्यात आले.तर विशेष शिबीर अनुदान ४५०  वरून ७०० प्रति विद्यार्थी करण्यात आले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी (Savitribai Phule Pune University) संलग्न महाविद्यालयात या निर्णयाची अंमलबजावणी करण्यास व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील एनएनएसच्या १६ हजार ५०० विद्यार्थ्यांना तर शिबिरात सहभागी होणाऱ्या ८  हजार २५०  विद्यार्थ्यांना यामुळे फायदा होणार आहे.विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत एनएनएसचे कामकाज आणि  अनुदानासंदर्भात सखोल चर्चा करण्यात आली.तसेच सेल्फी विथ मेरी माती विश्वविक्रमात भरीव योगदान दिल्याबद्दल एनएनएस आणि विद्यार्थी विकासार्थ विभागाचा अभिनंदनाचा ठराव व्यवस्थापन परिषद सदस्य सागर वैद्य यांनी मांडला.त्यास बागेश्री मंठाळकर यांनी अनुमोदन दिले.

हेही वाचा : स्वायत्त महाविद्यालयांवर विद्यापीठाकडून कारवाई

  गेल्या वर्षीच्या थकीत अनुदानामुळे ग्रामीण भागातील  स्वयंसहयीत महाविद्यालये आणि समन्वयक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यांना त्वरित मागील अनुदान मिळण्यासाठी यावेळी आग्रह धरण्यात आला. सुमारे ५ कोटीचे हे अनुदान केंद्र आणि राज्य सरकारकडे पाठपुरावा करून त्वरित मिळावे,यासाठी पाठपुरावा करण्याची मागणी सागर वैद्य यांनी केली.
-------------------

" मागील थकबाकीसाठी व्यवस्थापन परिषद सदस्यांनी राज्य सरकारकडे तर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सुरेश गोसावी हे राज्यपाल यांच्याकडे याबाबत पाठपुरावा करावा.असा निर्णय व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत घेण्यात आला."

- सागर वैद्य , व्यवस्थापन परिषद सदस्य , सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ