NLC इंडियामध्ये 588 जागांसाठी मेगा भरती सुरू;
इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. भरती प्रक्रियेत सहभागी होणारे उमेदवार NLC चे अधिकृत संकेत https://web.nlcindia.in/ldc_tat_gat_2025/ वर अर्ज भरू शकतात.

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन (NLC) इंडिया लिमिटेड अंतर्गत ग्रॅज्युएट अप्रेंटिस, (NLC India Limited Graduate Apprentice Recruitment) टेक्निशियन अप्रेंटिस पदांच्या एकूण 588 रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया (Recruitment process begins) राबवण्यात येत आहे. त्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. भरती प्रक्रियेत सहभागी होणारे उमेदवार NLC च्या अधिकृत संकेतस्थळ https://web.nlcindia.in/ldc_tat_gat_2025/ वर जाऊन अर्ज भरू शकतात.
अर्ज प्रक्रिया सोमवार दि. ९ डिसेंबरपासून सुरू झाली आहे. भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा असून अर्ज करण्याची अंतिम मुदत २३ डिसेंबर २०२४ देण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेद्वारे ग्रॅज्युएट अप्रेंटिस पदाच्या ३३६ जागा तर टेक्निशियन अप्रेंटिस पदाच्या २५२ जागा अशा एकूण ५८८ जागा भरल्या जाणार आहेत.
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज भरणाऱ्या उमेदवाराने नर्सिंग / B.Sc नर्सिंग / अभियांत्रिकी मध्ये पदवी / नर्सिंग मध्ये डिप्लोमा / अभियांत्रिकी पदविका यापैकी एकामध्ये पदविका/पदवीधर असणे आवश्यक आहे. यासोबतच उमेदवाराचे वय शिकाऊ नियमानुसार असावे. पात्रता आणि निकषांच्या तपशीलवार तपशीलांसाठी, उमेदवार अधिसूचना संकेतस्थळावर पाहू शकतात.
अर्ज कसा करायचा
NLC इंडिया अप्रेंटिसशिप भरतीमध्ये सामील होण्यासाठी, सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट https://web.nlcindia.in/ldc_tat_gat_2025/ ला भेट द्या. वेबसाइटच्या होम पेजवरील करिअर बटणावर क्लिक करा. त्यानंतर प्रशिक्षणार्थी विभागात जा आणि भरतीशी संबंधित अर्जाच्या लिंकवर क्लिक करा. आता उमेदवारांनी नवीन पृष्ठावर विचारलेला सर्व तपशील भरून अर्ज प्रक्रिया पूर्ण करावा. अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यास सबमिट करून त्याची प्रिंट काढून घ्यावी.