स्पर्धा परीक्षेसाठी वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना मुदतवाढ ?
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणार सर्व परीक्षा तसेच इतर स्पर्धा परीक्षेसाठी वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना सरसकट ३१ डिसेंबर २०२७ पर्यंतची वयोमर्यादा वाढवण्यात यावी, अशी मागणी स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
कोरोनाच्या काळात म्हणजे २०२० व २०२१ मध्ये आणि त्यानंतरही महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षांच्या जाहिराती वेळेवर काढण्यात आल्या नाहीत. त्यामुळे लाखो उमेदवारांना या काळात होणार्या परीक्षा देण्याची संधी (Opportunity to take the exam) मिळाली नाही. ती हुकलेली संधी आता मिळावी म्हणून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात याणाऱ्या सर्व परीक्षा तसेच इतर स्पर्धा परीक्षेसाठी वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना (Candidates who have exceeded the age limit) सरसकट ३१ डिसेंबर २०२७ पर्यंतची वयोमर्यादा वाढवण्यात यावी, अशी मागणी स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने (Competitive Examination Coordination Committee) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्याकडे केली आहे.
सरकारने हा निर्णय जाहीर केल्यास वयोमर्यादा वाढलेल्या लाखो उमेदवारांना त्याचा फायदा होईल. फक्त MPSC साठीच नाही तर सरळसेवा, पोलीस भरतीसह सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये वयोमर्यादा वाढविण्याचा शासन निर्णय सरकारने तत्काळ प्रसिद्ध करावा, अशी आग्रही मागणी करण्यात आली. त्यासंदर्भात स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने आपल्या 'एक्स' सोशल मिडिया अकाउंटद्वारे पोस्ट शेअर केली आहे.
दरम्यान, समितीकडून नोकर भरती संदर्भात आवाज उठवणारे माजी मंत्री आदित्य ठाकरे, आ. जितेंद्र आव्हाड, आ. रोहित पवार, आ. अभिमन्यू पवार यांना टॅग # करण्यात आले आहे. तर ज्यांकडे ही मागणी करण्यात आली आहे. त्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सीएमओ महाराष्ट्र कार्यालयाला देखील टॅग करण्यात आले आहे.
eduvarta@gmail.com