NEP 2020 : देशातील पहिल्या दोन परदेशी विद्यापीठांमध्येही होणार अंमलबजावणी

२०२४ च्या शैक्षणिक सत्रापासून प्रथमच घरी बसून विद्यार्थ्यांना दोन परदेशी विद्यापीठांमध्ये मास्टर्स शिकण्याची संधी मिळणार आहे.

NEP 2020 : देशातील पहिल्या दोन परदेशी विद्यापीठांमध्येही होणार अंमलबजावणी
Dharmendra Pradhan

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

देशभरातील अनेक शिक्षण संस्थांमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची (NEP 2020) अंमलबजावणी सुरू झालेली आहे. आता देशातील पहिल्या दोन परदेशी विद्यापीठांमध्येही (Foreign Universities) NEP लागू होईल, अशी माहिती केंद्रीय शिक्षण आणि कौशल्य विकास मंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांनी दिली आहे.

 

२०२४ च्या शैक्षणिक सत्रापासून प्रथमच घरी बसून विद्यार्थ्यांना दोन परदेशी विद्यापीठांमध्ये मास्टर्स शिकण्याची संधी मिळणार आहे. ऑस्ट्रेलियातील डीकिन आणि वोलोंगॉन्ग विद्यापीठे जुलैच्या सत्रापासून भारतात त्यांची पहिली तुकडी सुरू  करतील. त्यासाठीचे अर्ज जानेवारी आणि मार्चपासून सुरू होतील.

EDUVARTA IMPACT : प्राध्यापक पदाचा अर्ज ऑनलाईन केला उपलब्ध; उमेदवारांना दिलासा

 

विशेष बाब म्हणजे ऑस्ट्रेलियाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) 2020 च्या शिफारशींना पाठिंबा दिला आहे,  ज्यामुळे भारतीय शिक्षण व्यवस्थेत बदल होणार आहेत.  त्यांच्या दोन्ही विद्यापीठांनी आंतरराष्ट्रीय मानकांसह NEP 2020 नुसार भारतीय कॅम्पसमध्ये उच्च शिक्षण देणार असल्याचे म्हटले आहे.

 

प्रधान म्हणाले की, आता त्यांना घरी बसून परदेशी विद्यापीठातून शिक्षण घेण्याची संधी मिळणार आहे. दोन ऑस्ट्रेलियन विद्यापीठे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP 2020) च्या अनुषंगाने GIFT सिटीमध्ये त्यांचे संबंधित आंतरराष्ट्रीय कॅम्पस स्थापन करत आहेत. शिक्षणाचे आंतरराष्ट्रीयीकरण आणि भारतातील नामांकित शैक्षणिक संस्थांचे अस्तित्व त्यामुळे अधोरेखित होते.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/BPAVux2QlP06nhF9X9NQYO