आश्रमशाळांमध्ये शिक्षकांची २८२ पदे भरणार; आयुर्वेद, युनानीतील अध्यापकांची नियुक्ती राज्य निवड मंडळामार्फत

इतर मागास व बहुजन कल्याण विभागामार्फत १४१ कला व विज्ञान तसेच ७ कला व वाणिज्य अशी १४८ उच्च माध्यमिक आश्रमशाळा आहेत.  उच्चस्तरीय सचिव समितीने गणित आणि विज्ञान विषयांकरिता पदे निर्माण करण्यास मान्यता दिली आहे. 

आश्रमशाळांमध्ये शिक्षकांची २८२ पदे भरणार; आयुर्वेद, युनानीतील अध्यापकांची नियुक्ती राज्य निवड मंडळामार्फत

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

आश्रमशाळेतील (Ashramshala) विद्यार्थ्यांना गणित, विज्ञानात पारंगत करण्यासाठी शिक्षकांची २८२ पदे भरण्याचा (Teachers Recruitment) निर्णय बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत (Cabinet Meeting) घेण्यात आला. तसेच अनुदानित खासगी आयुर्वेद, युनानी महाविद्यालयांतील अध्यापकांची पदे राज्य निवड मंडळामार्फत (State Selection Board) भरण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला.

 

बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) होते. इतर मागास व बहुजन कल्याण विभागामार्फत १४१ कला व विज्ञान तसेच ७ कला व वाणिज्य अशी १४८ उच्च माध्यमिक आश्रमशाळा आहेत.  उच्चस्तरीय सचिव समितीने गणित आणि विज्ञान विषयांकरिता पदे निर्माण करण्यास मान्यता दिली आहे.  त्यानुसार ही २८२ पदे निर्माण करण्यात येतील. यासाठी येणाऱ्या 30 कोटी खर्चास देखील आज मान्यता देण्यात आली.

फटाकेमुक्त दिवाळीसाठी राज्य सरकार आग्रही; विद्यार्थ्यांना दिली शपथ, जागृतीचे आवाहन

 

आश्रमशाळेतील विद्यार्थी बारावी विज्ञान शाखेतून उत्तीर्ण झाल्यावर वैद्यकीय, अभियांत्रिकी, स्थापत्य अशा व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतात.  त्यांना गणित आणि विज्ञानावर आधारित नीट आणि सीईटी सारख्या परिक्षांना सामोरे जावे लागते. आर्थिक परिस्थितीमुळे खासगी ट्यूशन आणि क्लासेस न मिळाल्याने हे विद्यार्थी स्पर्धेत टिकत नाहीत त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

 

आयुर्वेद, युनानीतील अध्यापकांची भरती

अनुदानित खासगी आयुर्वेद, युनानी महाविद्यालयांतील अध्यापकांची पदे राज्य निवड मंडळामार्फत भरण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.  त्यानुसार अतिरिक्त मुख्य सचिव किंवा प्रधान सचिव, वैद्यकीय शिक्षण अध्यक्षस्थानी असतील. 

 

आयुष संचालनालयाचे संचालक, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे सेवानिवृत्त कुलगुरु, सह सचिव दर्जापेक्षा कमी नसलेले सामाजिक न्याय व सामान्य प्रशासन विभागातील प्रतिनिधी, संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञ आणि अनुदानित खासगी आयुर्वेद व युनानी संस्थांचे व्यवस्थापन किंवा महाविद्यालयाचे नामनिर्देशित व्यक्ती हे या निवड मंडळाचे सदस्य असतील.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/BPAVux2QlP06nhF9X9NQYO