मुंबई विद्यापीठाची कमाल, ९ दिवसांत लावला परीक्षेचा निकाल.. 

काही दिवसांपूर्वी मुंबई विद्यापीठाने बीएससी सहाव्या सत्रासाठी पुनर्रपरीक्षा घेतली होती. या परीक्षेला २ हजार ९२६ विद्यार्थ्यांच्या समावेश होता. त्यानंतर अवघ्या ९ दिवसांत निकाल जाहीर करून विद्यापीठाने कमाल केली आहे.

मुंबई विद्यापीठाची कमाल, ९ दिवसांत लावला परीक्षेचा निकाल.. 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

नेहमीच वादाच्या भोवऱ्यात सापडणाऱ्या मुंबई विद्यापीठाने (Mumbai University) कमाल केली आहे. कारण बीएससी पुनर्रपरीक्षेचा निकाल आवघ्या ९ दिवसांत जाहीर (BSC re-examination results announced) करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी मुंबई विद्यापीठाने बीएससी सहाव्या सत्रासाठी पुनर्रपरीक्षा घेतली होती. या परीक्षेला २ हजार ९२६ विद्यार्थ्यांच्या समावेश होता. त्यानंतर अवघ्या ९ दिवसांत निकाल जाहीर करून विद्यापीठाने कमाल केली आहे. त्यामुळे या सर्व विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. 

मागील काही वर्षापासून मुंबई विद्यापीठाला निकाल उशीरा जाहीर केला जातो म्हणून टीका केली जात होती. मात्र, आता विद्यापीठाने निकाल वेळेत लावण्यासाठी प्रयत्न सुरू केले असून, त्याचा सकारात्मक परिणाम दिसत आहे. त्यातून नुकत्याच पार पडलेल्या हिवाळी द्वितीय सत्रातील पुनर्रपरीक्षांचे निकाल वेळेत लावण्यात विद्यापीठाला यश आले आहे. विद्यापीठाने बीकॉम सत्र ६ परीक्षेचा निकाल १६ दिवसांत जाहीर केला आहे.

विद्यापीठाने जाहीर केलेले निकाल 

बीकॉम अकाउंट अँड फायनान्स सत्र ६ परीक्षेचा निकाल २२ दिवसांत, तर बीएमएस सत्र ६ परीक्षेचा निकाल २० दिवसांत जाहीर करण्यात आला आहे, अशी माहिती विद्यापीठ प्रशासनाने दिली. बीकॉम सत्र ६ एटीकेटी परीक्षेसाठी १४ हजार १९१, बीकॉम अकाउंट अँड फायनान्ससाठी १ हजार ३१, तर बीएमएस परीक्षेसाठी १ हजार ५४९ एवढे विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्याचबरोबर, बीफार्म सत्र ८ चा निकाल १८ दिवसांत, तर बीआर्च सत्र सहाचा निकाल १४ दिवसांत जाहीर करण्यात आला. हे सर्व निकाल विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत, अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालिका डॉ. पूजा रौंदळे यांनी दिली.