MAHA DBT स्कॉलरशिपचा अर्ज भरला का; शिक्षण विभागाची विद्यार्थ्यांसाठी विशेष मोहीम

अधिकाधिक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजनेमध्ये सामावून घेण्यासाठी येत्या 25 ते 30 नोव्हेंबर या कालावधीत विशेष मोहीम राबवावी, अशा सूचना शिक्षण विभागातर्फे देण्यात आले आहेत.

MAHA DBT स्कॉलरशिपचा अर्ज भरला का; शिक्षण विभागाची विद्यार्थ्यांसाठी विशेष मोहीम

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

राज्याच्या उच्च शिक्षण संचालनालयामार्फत विद्यार्थ्यांसाठी महाडीबीटी पोर्टलच्या (MahaDBT Portal) माध्यमातून 14 शिष्यवृत्ती योजना राबविल्या जातात. मात्र प्रवेशित विद्यार्थ्यांच्या तुलनेत शिष्यवृत्तीसाठी अतिशय कमी विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज (scholarship applications)भरले आहेत.त्यामुळे सर्व विद्यापीठ व महाविद्यालयांनी (Universities and colleges) अधिकाधिक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजनेमध्ये (Scholarship scheme for students)सामावून घेण्यासाठी येत्या 25 ते 30 नोव्हेंबर या कालावधीत विशेष मोहीम (special campaign) राबवावी, अशा सूचना शिक्षण विभागातर्फे देण्यात आले आहेत.

पुणे विभागीय शिक्षण सहसंचालक कार्यालयातर्फे शिष्यवृत्ती योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, डेक्कन कॉलेज, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, गोखले इन्स्टिट्यूट, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, एसएनडीटी विद्यापीठ, कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ यासह विद्यापीठांशी संलग्न सर्व अनुदानित विनाअनुदानित व कायम विनाअनुदानित संलग्न महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज भरून घेण्यासाठी विशेष मोहीम राबवावे, असे आदेश देण्यात आले आहेत.उच्च शिक्षण विभागाच्या शिष्यवृत्ती योजनेसाठी प्रवेशित विद्यार्थ्यांच्या तुलनेत अतिशय कमी ऑनलाईन अर्ज महाडीबीटी पोर्टलवर प्राप्त झाले आहेत,असे शिक्षण विभागातर्फे वेळोवेळी घेण्यात आलेल्या ऑनलाईन मीटिंग, प्रसिद्ध करण्यात आलेली परिपत्रके, तसेच वेळोवेळी देण्यात आलेल्या सूचनांमधून  कळविण्यात आले आहे.

 शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ व्हावी, या उद्देशाने महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांसाठी संगणक सुविधा, इंटरनेट सुविधा उपलब्ध करून द्यावी तसेच शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करावे. सर्व महाविद्यालय व संस्था आणि विद्यापीठ यांनी महाडीबीटी पोर्टलवर विशेष मोहीमे अंतर्गत राबविण्यात आलेल्या सप्ताहाच्या अनुषंगाने कार्यवाहीचा अहवाल उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयास सादर करावा, अशा सूचना पुणे विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक डॉ.अशोक उबाळ यांनी दिल्या आहेत. त्यामुळे सर्व महाविद्यालयांना येत्या 25 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीत विद्यार्थ्यांकडून शिष्यवृत्ती अर्ज भरून घेण्यासाठी विशेष सप्ताहाचे आयोजन करावे लागणार आहे.