शिक्षक मतदार संघाच्या निवडणुका जाहीर; मुंबई, नाशिकसाठी १० जूनला मतदान 

राज्य निवडणुक आयोगाकडून नाशिक आणि मुंबई शिक्षक मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

शिक्षक मतदार संघाच्या निवडणुका जाहीर; मुंबई, नाशिकसाठी १० जूनला मतदान 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

सध्या राज्यासह देशभरात निवडणुकींचा धुराळा उडताना दिसत आहे. त्यातच आता राज्य निवडणुक आयोगाकडून (State Election Commission) नाशिक आणि मुंबई शिक्षक मतदारसंघाचा (Nashik and Mumbai teachers constituencies) निवडणूक कार्यक्रम जाहीर (Election program announced) करण्यात आला आहे. नाशिक आणि मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी येत्या १० जून रोजी मतदान (Voting on June 10) घेण्यात येणार असून येत्या १३ जूनला मतमोजणी पार पडणार आहे. 

महाराष्ट्र विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघातील २ जागांसाठी निवडणुक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये मुंबई आणि नाशिक शिक्षक मतदारसंघाचा समावेश असणार आहे. या दोन्ही जागांसाठी १५ मे रोजी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रकिया सुरू होणार आहे. तर २२ मे हा उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असणार आहे. अर्ज प्राप्त झाल्यानंतर २४ मे रोजी अर्जांची छाणणी केली जाणार आहे. तसेच अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख २७ मे आहे. तर प्रत्यक्ष मतदान हे १० मे रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ दरम्यान मतदान होणार आहे, अशी माहिती निवडणुक आयोगाने दिली आहे. 

दरम्यान, ७ जुलै २०२४ रोजी नाशिक शिक्षक मतदारसंघाचे आमदार दराडे भिकाजी तसेच मुंबई शिक्षक मतदारसंघाचे आमदार कपील पाटील यांचा कार्यकाळ संपणार आहे. त्यामुळे या दोन जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. नाशिक विभागात नाशिक, अहमदनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांचा समावेश आहे. या पाच जिल्ह्यात मिळून एकूण ६४ हजार ८०८ शिक्षक मतदार आहेत.