MHT सीईटी २०२४ : आता उमेदवारांना करता येणार नोंदणी अर्जामध्ये दुरुस्ती 

उमेदवारांकडून अर्ज भरताना अनावधनाने विविध प्रकारच्या चुका झालेल्या आहेत. त्याअनुषंगाने ऑनलाईन पद्धतीने भरलेल्या अर्जात दुरुस्ती करण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. 

MHT सीईटी २०२४ : आता उमेदवारांना करता येणार नोंदणी अर्जामध्ये दुरुस्ती 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

शैक्षणिक वर्षे २०२४-२५ (Academic Years 2024-25) करीता राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (State Common Entrance Test) कक्षामार्फत विविध पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या (Graduate and Post Graduate Course) प्रवेशाकरीता सामाईक प्रवेश परीक्षा घेण्यात येते. यामध्ये काही उमेदवारांकडून अर्ज भरताना अनावधनाने विविध प्रकारच्या चुका झालेल्या आहेत. त्याअनुषंगाने सदर उमेदवारांच्या शैक्षणिक हिताचा विचार करुन उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने भरलेल्या अर्जात दुरुस्ती करण्याची संधी (Opportunity to amend the application) उपलब्ध करुन देण्यात आली आहे. 

तंत्रशिक्षण व कृषीशिक्षण विभागातर्गत असलेल्या एमएचटी सीईटी २०२४ या सामाईक प्रवेश परीक्षेकरीता ज्या उमेदवारांनी नोंदणी प्रक्रिया परीक्षा शुल्क अदा करुन पुर्ण केलेली आहे. त्यापैकी काही उमेदवारांकडून अर्ज भरताना अनावधनाने विविध प्रकारच्या चुका झालेल्या आहेत. त्या दुरुस्त करण्याताबत कार्यालयाकडे लाॅगीनमधून, दूरध्वनी, ईमेलद्वारे  व प्रत्यक्ष कार्यालयात भेट देऊन विनंती करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेवून हा निर्णय घेण्यात आला आहे. 

उमेदवारांना अधिकृत संकेतस्थळ cetcell.mahacet.org वर जाऊन नाव, जन्मतारीख, फोटो, सही, लिंग, ग्रुप बदल करणे, ग्रुप समावेश करणे (अतिरीक्त विलंब शुल्कासह) यांमध्ये दुरुस्ती करता येणार आहे. वरील सर्व बदल करण्याचा कालावधी २० मार्च ते २२ मार्चपर्यंत आहे. उमेदवारांना स्वतःच्या लाॅगीनमधून अर्जामध्ये सुधारणा करता येणार आहेत. 

१) महा-बीएड, एमएड (३ वर्षे एकात्मिक) सीईटी २०२४, २) महा-एमएड सीईटी २०२४, ३) महा-एमपी एड सीईटी २०२४, ४) महा-बी.एड (नियमित व विशेष) बी. एड इएलसीटी सीईटी २०२४, ५) महा-बी.पी.एड सीईटी २०२४, ६) महा-एमबीए/एमएमएस सीईटी २०२४, ७) महा-एमआर्च सीईटी २०२४, ८) महा-एम.एचएमसीटी  सीईटी २०२४, ९) महा-एमसीई सीईटी २०२४, १०) महा-बी.डिझाईन सीईटी २०२४, ११) महा-बी.एचएमसीटी सीईटी २०२४ या सर्व अभ्यासक्रमासाठी सीईटी कक्षामार्फत परीक्षा घेतली जाते. लाखो विद्यार्थी यासाठी अर्ज करतात.  काही अडचणींमुळे झालेल्या चुका सुधारण्याची संधी उपलब्ध झाली आहे.