वादग्रस्त नाटक : प्रवीण भोळे यांच्यावरील पोलीस कारवाई अन्यावश्यक; न्यायालयीन खर्च विद्यापीठाने करावा

वादग्रस्त नाटक : प्रवीण भोळे यांच्यावरील पोलीस कारवाई अन्यावश्यक; न्यायालयीन खर्च विद्यापीठाने करावा

 एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील (Savitribai Phule Pune University) ललित कला केंद्रात (Fine Arts Centre)सादर झालेल्या वादग्रस्त नाटकामुळे विद्यार्थी आणि विभागप्रमुख प्रा.प्रवीण भोळे (Head of Department Prof. Praveen Bhole)यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र,शिक्षक आणि विद्यार्थी यांना मुक्तपणे विचार करण्याचे,अभिव्यक्त होण्याचे अधिकार देणे अवश्यक आहे. तसेच ललित कला केंद्रात घडलेली हिंसक घटना विद्यापीठाच्या शैक्षणिक स्वायतत्तेवर गदा आणणारी असून शैक्षणिक कर्तव्य पार पाडत असताना केलेली पोलीस कारवाई अनावश्यक (police action unnecessary)आहे.त्यामुळे या प्रकरणी होणारा न्यायालयीन कामकाजाचा सर्व खर्च विद्यापीठाने करावा,अशी मागणी विद्यापीठाचे अधिसभा सदस्य हर्ष जगझाप (Senate Member Dr. Harsh Jagzap)यांनी प्रस्तावाद्वारे केली आहे.

विद्यापीठाच्या 2024-25 या वर्षांचे बजेट सादर करण्यासाठी येत्या 23 मार्च रोजी विद्यापीठातर्फे अधिसभेची बैठक बोलवण्यात आली आहे.त्यात विविध प्रस्ताव सादर केले जाणार आहे.त्यातील एक प्रस्ताव ललित कला केंद्राविषयीचा असून विद्यापीठाचे अधिसभा सदस्य हर्ष जगझाप यांनी अधिसभेसमोर हा प्रस्ताव सादर करण्यासाठी दिला आहे.या प्रस्तावामुळे सुध्दा वाद होऊ शकतो,असा अंदाज माजी अधिसभा सदस्यांकडून व्यक्त केला जात आहे.

विद्यापीठे ही राष्ट्राच्या भवितव्याला आकार देण्याची क्षमता असलेले ज्ञान निर्मिती आणि नेतृत्व घडविणारी संस्था आहे. विद्यापीठाची ही क्षमता अबाधित राहावी आणि वृद्धिंगत व्हावी यासाठी विद्यापीठाची शैक्षणिक स्वायत्तता जपणे आणि विद्यापीठाच्या परिसरात सर्व घटकांच्या मुक्त विचार आणि अभिव्यक्ती आणि अंतर्गत सुरक्षितता राखणे या बाबी अत्यंत आवश्यक आहेत. या बाबींची हमी विद्यापीठाशी संबंधित सर्व घटकांना देणे ही विद्यापीठ प्रशासनाची जबाबदारी आहे. विद्यापीठांच्या शैक्षणिक स्वायत्तता जपण्यासाठी शैक्षणिक कामकाजाचे घटक असलेल्या शिक्षक आणि विद्यार्थी यांना मुक्तपणे विचार करण्याचे,अभिव्यक्त होण्याचे अधिकार देणे अवश्यक आहे. याचाच भाग म्हणून विद्यार्थ्यांचा चुका करण्याचा अधिकारही मान्य करणे आवश्यक आहे.सबब, दि. ०२ फेब्रुवारी २०२४ रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्रात घडलेली हिंसक घटना विद्यापीठाच्या शैक्षणिक स्वायतत्तेवर गदा आणणारी आहे. त्यामुळे ललित कला केंद्राचे विद्यार्थी आणि विभागप्रमुख प्रा. प्रवीण भोळे यांच्यावरती विद्यापीठासाठीचे निहित शैक्षणिक कर्तव्य पार पाडत असताना केली गेलेली पोलीस कारवाई अनावश्यक आहे.

सबब, ही अधिसभा अशी शिफारस करीत आहे की, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्राचे विद्यार्थी आणि विभागप्रमुख प्रा. प्रवीण भोळे यांच्यावरती विद्यापीठासाठीचे निहित शैक्षणिक कर्तव्य पार पाडत असताना केल्या गेलेल्या पोलीस कारवाही विरोधात करावयाच्या न्यायालयीन कामकाजाचा सर्व खर्च विद्यापीठाने करावा,असा प्रस्ताव हर्ष जगझाप यांनी अधिसभेसमोर मांडण्यासाठी दिला आहे.