MBA/B. Ed/M. Ed अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू; 22 जुलैपर्यंत मुदत 

प्रवेशासाठी सीईटी सेलच्या अधिकृत संकेतस्थळ https://cetcell.mahacet.org/ वर नोंदणी करता येणार आहे.  उमेदवारांना ऑनलाइन अर्ज आणि कागदपत्रे अपलोड करण्यासाठी २२ जुलै सायंकाळी ५ वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

MBA/B. Ed/M. Ed अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू; 22 जुलैपर्यंत मुदत 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

राज्य सामायिक प्रवेश परीक्षा (State Common Entrance Test) कक्षातर्फे विविध अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. एमबीए, एमएमएस,  बी. एड, एम. एड, बी फार्मसी (प्रॅक्टिस), बी.पी.एड, एम.पी.एड आणि एम. एड (MBA, MMS, B. Ed, M. Ed, B.P.Ed, M.P.Ed and M.p. Ed) या प्रवेश प्रक्रियेला सुरूवात (Start the admission process) झाली आहे. प्रवेशासाठी सीईटी सेलच्या अधिकृत संकेतस्थळ https://cetcell.mahacet.org/ वर नोंदणी करता येणार आहे.  उमेदवारांना ऑनलाइन अर्ज आणि कागदपत्रे अपलोड करण्यासाठी 12 जुलैपासून २२ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

कागदपत्रांची पडताळणी आणि अर्ज निश्चिती १३ जुलैपासून  २३ जुलै सायंकाळी ५ पर्यंत होणार आहे. येत्या २५ जुलै रोजी तात्पुरती गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येईल. तात्पुरत्या गुणवत्ता यादीवर विद्यार्थ्यांना २६ ते २८ जुलै दरम्यान हरकती नोंदवता येणार आहेत. तर ३० जुलै रोजी अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येईल. 

BE Admission : इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक प्रसिध्द

राज्यातील सरकारी, अनुदानित, विद्यापीठाचे व्यवस्थापन असलेल्या संस्था आणि विभाग विनाअनुदानित खासगी शिक्षण संस्थांमधील व्यवस्थापनांतर्गत मास्टर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन (MBA) आणि मास्टर ऑफ मॅनेटमेंट स्टडीज (MMS), बी. एड, एम. एड, बी.पी.एड, एम.पी.एड आणि एम. एड या पदव्युत्तर पदवी आणि पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशाची प्रक्रिया सुरू झाली आहे. महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (CET Cell) या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ऑनलाइन नोंदणी, कागदपत्रे अपलोड करणे, कागदपत्रांची पडताळणी, ऑनलाइन अर्ज निश्चिती यासाठीचे सविस्तर वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. 

याबाबत सीईटी सेलने अधिकृत संकेतस्थळावर परिपत्रक काढून विद्यार्थ्यांना सूचना दिल्या आहेत. या प्रवेश प्रक्रियेत २२ जुलैनंतर ऑनलाइन नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचे अर्ज नाॅन-कॅप प्रवेशासाठी ग्राह्य धरले जातील. तसेच २३ जुलैनंतर कागदपत्रांची प्रत्यक्ष पडताळणी किंवा ई-स्क्रुटनी केलेल्या विद्यार्थ्यांचे अर्ज देखील नाॅन-कॅप जागांसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे, असे सीईटी सेलकडून सांगण्यात आले आहेत.