एम.एस्सी. इंटिग्रेटेड कोर्ससाठी अर्ज प्रक्रिया सुरु 'ही' अंतिम तारीख; विद्यार्थ्यांना 60 हजार रुपये स्कॉलरशीप

  बारावी विज्ञान (पीसीबीएम विषयांसह) उत्तीर्ण उमेदवारांसाठी ५ वर्षे कालावधीच्या एम.एस्सी. इंटिग्रेटेड कोर्स साठी प्रवेश  प्रक्रिया सुरु.

एम.एस्सी. इंटिग्रेटेड कोर्ससाठी अर्ज प्रक्रिया सुरु 'ही' अंतिम तारीख; विद्यार्थ्यांना 60 हजार रुपये स्कॉलरशीप

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 
 
बारावी विज्ञान शाखेतून (पीसीबीएम विषयांसह) उत्तीर्ण उमेदवारांसाठी ५ वर्षे कालावधीच्या एम.एस्सी. इंटिग्रेटेड कोर्स (M.Sc. Integrated Course) साठी प्रवेश  प्रक्रिया सुरु (Admission process started) झाली आहे. नॅशनल एन्ट्रन्स स्क्रीनिंग टेस्ट - २०२४ (NEST-2024) बेसिक सायन्सेस - बायोलॉजी, केमिस्ट्री, फिजिक्स आणि मॅथेमॅटिक्समधील ५ वर्षे इंटिग्रेटेड एम.एस्सी. प्रोग्रॅम (२०२४-२९) साठी एनईएसटी -२०२४ प्रवेश परीक्षा जाहीर करण्यात आली आहे. त्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्जासाठी येत्या ३१ मेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. 

प्रोग्रॅमसाठी प्रवेश परीक्षा ३० जून, २०२४ रोजी अहमदनगर, अकोला, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, मुंबई, नागपूर, पुणे, रत्नागिरी, नांदेड, कोल्हापूर, जळगाव यासह देशभरातील १२९ केंद्रांवर घेतली जाणार आहे. निवडलेल्या उमेदवारांना ६० हजार रुपये वार्षिक स्कॉलरशीप DISHA प्रोग्रॅमसाठी डिपार्टमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जीतर्फे दिली जाईल. शिवाय इन्टर्नशिपसाठी दरवर्षी २० हजार रुपये दिले जातात.

बारावी (बायोलॉजी/ केमिस्ट्री/ फिजिक्स/ मॅथ्स) या विषयांसह किमान ६० टक्के गुण मिळवून २०२२-२३ मध्ये उत्तीर्ण किंवा २०२२ ला १२ वी (विज्ञान) परीक्षेला बसणारे उमेदवार पात्र आहेत. (अजा/ अज/ दिव्यांग यांना ५५ टक्के गुण आवश्यक)

कॉम्प्युटर बेस्ड ऑब्जेक्टिव्ह टाईप टेस्ट ज्यात बायोलॉजी, फिजिक्स, केमिस्ट्री व मॅथेमॅटिक्स या चार विषयांच्या ११ वी/१२ वी NCERT/ CBSE अभ्यासक्रमावर आधारित प्रत्येकी ६० गुण (४ विषयांपैकी बेस्ट ऑफ थ्रीनुसार १८० गुणांमधून) NISER आणि UM- DAE CEBS साठी वेगवेगळी मेरिट लिस्ट बनविली जाईल. NEST परीक्षेचा निकाल www. nestexam. in या संकेतस्थळावर दि. १० जुलै २०२४ रोजी जाहीर केला जाईल. 

ऑनलाइन अर्ज www. nestexam. in या संकेतस्थळावर दि. ३१ मे २०२४ (२३.५९ वाजे) पर्यंत करावेत. nest@cbs. ac. in या प्रोग्राममधून अतिउत्तम कामगिरी करणारे उमेदवार BARC ट्रेनिंग स्कूलच्या ट्रेनी सायंटिफिक ऑफिसर पदांच्या निवडीसाठी होणाऱ्या मुलाखती करिता पात्र ठरतील.