आता NCERT पाठ्यपुस्तकांची दरवर्षी होणार समीक्षा 

NCERT च्या पाठ्यपुस्तकांचे आता दरवर्षी पुनर्रावलोकन केले जाईल.

आता NCERT पाठ्यपुस्तकांची दरवर्षी होणार समीक्षा 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

सध्या नॅशनल कौन्सिल फॉर एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग (NCERT)  नवीन अभ्यासक्रम फ्रेमवर्क (NCF) नुसार पाठ्यपुस्तके विकसित करण्याच्या प्रक्रियेत आहे. या अंतर्गत एनसीईआरटीने इयत्ता 3 ते 12 वीच्या पुस्तकांमध्ये मोठे बदल केले आहेत. काही वर्गांची पुस्तके या सत्रात येतील, तर काही वर्गांची पुस्तके पुढील सत्रापासून येतील. पण याच दरम्यान एक माहिती समोर आली आहे. ज्यामध्ये पुस्तकांच्या समीक्षेबद्दल बोलले गेले आहे.

मीडिया रिपोर्ट नुसार NCERT च्या पाठ्यपुस्तकांचे आता दरवर्षी पुनर्रावलोकन केले जाईल. शिक्षण मंत्रालयाकडून या संदर्भात एनसीईआरटीला निर्देश देण्यात आले असल्याचे समजते. मात्र, एनसीईआरटीने याबाबत अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य केलेले नाही.  
रिपोर्ट नुसार आता पाठ्यपुस्तकांचे वार्षिक आधारावर पुनर्रावलोकन केले जाईल. तसेच नवीन अभ्यासक्रमानुसार पाठ्यपुस्तके 2026 पर्यंत सर्व वर्गांसाठी तयार होतील." 

दरम्यान, NCERT ने अलीकडेच काही प्रकाशकांना त्यांच्या शालेय पुस्तकांच्या कॉपीराइट उल्लंघनाबद्दल चेतावणी दिली होती. एनसीईआरटीने म्हटले होते की,  ' काही  प्रकाशक एनसीईआरटीची परवानगी न घेता एनसीईआरटी वेबसाइटवर उपलब्ध असलेली एनसीईआरटी शाळेची पाठ्यपुस्तके त्यांच्या स्वत: च्या नावाने प्रकाशित करत आहेत. त्यांच्यावर कॉपीराइट कायदा 1957 अंतर्गत कारवाई केली जाईल.'