सीए परीक्षेचे निकाल 11 जुलैला जाहीर होणार 

विद्यार्थी icai.nic.in या अधिकृत पोर्टलवरून लिंक सक्रिय झाल्यानंतर निकाल पाहू शकतील.

सीए परीक्षेचे निकाल 11 जुलैला जाहीर होणार 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

सीए फायनल आणि इंटरमिजिएट मे 2024 च्या परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांसाठी मोठी अपडेट आहे. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाने (ICAI) CA फायनल आणि CA इंटरमिजिएट अभ्यासक्रमांच्या मे 2024 च्या परीक्षांचे निकाल जाहीर करण्याची तारीख औपचारिकपणे जाहीर केली आहे. संस्थेने प्रसिद्ध केलेल्या अधिकृत सूचनेनुसार, चार्टर्ड अकाउंटंट्सच्या अंतिम आणि इंटरमिजिएट मे 2024 च्या परीक्षांचे निकाल येत्या 11 जुलै रोजी जाहीर होण्याची शक्यता आहे.

प्राप्त माहितीनुसार, विद्यार्थी icai.nic.in या अधिकृत पोर्टलवरून लिंक सक्रिय झाल्यानंतर निकाल पाहू शकतील. दुसरीकडे, निकालासंबंधीचे अपडेट्स संस्थेच्या अधिकृत वेबसाइट icai.org वर प्रकाशित केले जातील, अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांनी दोन्ही संकेतस्थळांना वेळोवेळी भेट देत राहावे, अशा सूचना संस्थेने दिल्या आहेत. 
निकलासोबत संस्था  CA फायनल आणि इंटर परीक्षेची टॉपर्स यादी देखील जाहीर करेल. या यादीद्वारे, विद्यार्थी  त्यांचे गुण आणि अखिल भारतीय रँक (AIR) जाणून घेऊ शकतील.