विद्यापीठात ‘डिस्क्रिट मॅथेमॅटिक्स’वर आंतरराष्ट्रीय परिषद; नामवंत गणितज्ञ सहभागी होणार

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील गणित विभाग आणि सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ, पुणे यांच्या संयुक्त विद्यामाने या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

विद्यापीठात ‘डिस्क्रिट मॅथेमॅटिक्स’वर आंतरराष्ट्रीय परिषद; नामवंत गणितज्ञ सहभागी होणार

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात (Savitribai Phule Pune University)अकादमी ऑफ डिस्क्रिट मॅथेमॅटिक्स अँड ॲप्लिकेशन्स (एडीएमए) ची  ‘डिस्क्रिट मॅथेमॅटिक्स 2024’ (Discrete Mathematics) या २० व्या वार्षिक आंतरराष्ट्रीय परिषदेचे (international conference)आयोजन करण्यात आले आहे. विद्यापीठाच्या गणित विभागात  (mathematics department) ७ ते १० जून दरम्यान होणाऱ्या या परिषदेत जगभरातील विविध नामवंत गणितज्ञ सहभागी होणार आहेत.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील गणित विभाग आणि सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ, पुणे यांच्या संयुक्त विद्यामाने या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.या परिषदेचे उद्धाटन सकाळी ९.३० वाजता विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. (डॉ) सुरेश गोसावी यांच्या हस्ते होणार असून यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध गणितज्ञ आणि क्वीन्स युनिव्हर्सिटी, कॅनडाचे प्राध्यापक डॉ. राम मूर्ती (Canadian Professor Dr. Ram Murthy)उपस्थित राहणार आहेत. यावेळी एडीएमएचे अध्यक्ष प्रा. अंबट विजयकुमार, गणितज्ञ आणि हरिश्चंद्र संशोधन केंद्राचे माजी संचालक प्रा. रवी कुलकर्णी, विद्यापीठाच्या गणित विभागाचे प्रमुख  प्रा. विनायक जोशी, गणित विभागाचे प्रा. यशवंत बोरसे, सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या प्रा. चारुशीला देशपांडे आदी उपस्थित राहतील. 

 चार दिवस चालणाऱ्या या परिषदेत अनेक मान्यवर गणितज्ञ विविध विषयांवर व्याख्याने देणार आहेत. यात फ्रान्समधील कॅन नॉर्मंडी विद्यापीठातील प्राध्यापक फ्रेडरिक वेहरंग, हॅम्बर्ग विद्यापीठातील प्राध्यापक मॅथियास  शाक्ट, बुडापेस्ट विद्यापीठातील प्राध्यापक. जी. वाय. कटोना, न्यूयॉर्कमधील सिटी विद्यापीठातील प्राध्यापक सँड्रा किंगन, आयआयएससी बैंगलोरचे प्राध्यापक अपूर्व खरे, सीएसआयआरचे माजी महासंचालक प्राध्यापक शेखर मांडे, टीआयएफआरचे प्राध्यापक अमितवा भट्टाचार्य, श्रीनगर येथील काश्मीर विद्यापीठातील प्राध्यापक शरीफुद्दीन पिरजादा, आयआयएसइआरचे प्रा. सौमेन मैती आणि  प्रा. गणेश कडू या परिषदेत उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. या परिषदेत एकूण 100 व्याख्याने होणार आहेत.