SSC BOARD : दहावीच्या परीक्षा शुल्कात वाढ , खाजगी विद्यार्थी नोंदणी शुल्क 1 हजार 210 रुपये

जुलै- ऑगस्ट 2024 व मुख्य परीक्षा 2025 साठी सुधारित शुल्क आकारण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थी व पालकांच्या खांद्यावर वाढीव शुल्काचा भार पडणार आहे.

SSC BOARD : दहावीच्या परीक्षा शुल्कात वाढ , खाजगी विद्यार्थी नोंदणी शुल्क 1 हजार 210 रुपये

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education)घेतल्या जाणाऱ्या इयत्ता दहावीच्या परीक्षा शुल्कात वाढ (Increase in 10th exam fee)करण्याचा निर्णय राज्य मंडळाने घेतला आहे. त्यानुसार जुलै- ऑगस्ट 2024 व मुख्य परीक्षा 2025 साठी सुधारित शुल्क (revised fee )आकारण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थी व पालकांच्या खांद्यावर वाढीव शुल्काचा भार (Increased fee burden)पडणार आहे.
राज्य मंडळांने प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकानुसार विद्यार्थ्यांना 470 रुपये परीक्षा शुल्क, 20 रुपये प्रशासकीय शुल्क, 20 रुपये गुणपत्रिका लॅमिनेशन शुल्क , वीस रुपये प्रमाणपत्र शुल्क , 10 रुपये प्रात्यक्षिक परीक्षा शुल्क (शास्त्र विषय ),100 रुपये प्रात्यक्षिक परीक्षा शुल्क (तंत्र विषय) , 130 रुपये खाजगी विद्यार्थी नाव नोंदणी अर्ज (माहिती पुस्तिकेसह),  खाजगी विद्यार्थी नोंदणी शुल्क 1 हजार 210 रुपये आकारले जाणार आहे.

पुनर्परीक्षार्थी अर्थात रिपीटर व तुरळक विषय घेऊन परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वाढीव शुल्काचा तपशील राज्य मंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे श्रेणी सुधारण्यासाठी प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शुल्कातही वाढ करण्यात आली आहे, असे राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे प्रसिद्ध केले आहे.