महाराष्ट्रात 7 मे रोजी 'या' मतदारसंघात शाळा, महाविद्यालये  राहणार बंद

बहुतेक ठिकाणी मतदान केंद्र शाळा, महाविद्यालयात देण्यात आले आहेत. त्यामुळे शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.

महाराष्ट्रात 7 मे रोजी 'या' मतदारसंघात शाळा, महाविद्यालये  राहणार बंद

एज्युवार्ता न्यूज नेवटवर्क

सध्या देशात लोकसभा निवडणुकांचे (Lok Sabha Elections) वारे वाहत आहेत. तिसऱ्या टप्प्यात देशभरातली ९४ तर राज्यातील ११ मतदारसंघात ७ मे रोजी मतदान पार पडणार (Voting will be done) आहे. त्या अनुषंगाने  ७ मे रोजी राज्यातील शाळा, महाविद्यालय बंद राहणार (Schools, colleges will remain closed) आहेत. बहुतेक ठिकाणी मतदान केंद्र शाळा, महाविद्यालयात देण्यात आले आहेत. त्यामुळे शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. शिवाय सुरक्षेच्या कारणास्तव शाळा महाविद्यालयांना सुट्टी असणार आहे. 

तिसऱ्या टप्पात १२ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील ९४ लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. ही मतदान प्रक्रिया ७ मे रोजी पार पडणार आहे. विशेषतः महाराष्ट्रात, एकूण ११ मतदारसंघांत मतदान होणार आहे. मतदानाच्या दिवशी लातूर, धाराशिव, माढा, सोलापूर, कोल्हापूर, हातकणंगले, सांगली, सातारा, बारामती, रायगड, रत्नागिरी-सिंधुदुर्ग या मतदारसंघातील शाळा आणि महाविद्यालये ७ मे रोजी बंद राहणार आहेत.

सुरक्षेच्या कारणास्तव वरील मतदारसंघातील शाळा आणि महाविद्यालये निवडणुकीच्या दिवशी बंद राहतील. विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षितेसाठी आणि नोकर वर्गाने मतदानासाठी जास्तीत जास्त बाहेर पडावे यासाठी ही सुट्टी देण्यात आली आहे. शिवाय निवडणुकीच्या कामांमध्ये व्यस्त असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे काम कमी करणे, नागरीकांची सुरक्षा, या दिवसी काही अनुचित प्रकार घडू नये या उद्देशाने ही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.