IBPS लिपिक मुख्य परीक्षेसाठी प्रवेशपत्र प्रसिद्ध 

लिपिक भरतीच्या मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरलेले सर्व उमेदवार IBPS च्या अधिकृत वेबसाइट ibps.in वर जाऊन त्यांचे प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात. 

IBPS लिपिक मुख्य परीक्षेसाठी प्रवेशपत्र प्रसिद्ध 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

लिपिक भरती (CRP CLERKS-XIV) मुख्य परीक्षेसाठीचे प्रवेशपत्र आज रविवार दि. 6 ऑक्टोबर रोजी इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन (IBPS) द्वारे प्रसिद्ध (Admit card released) करण्यात आले आहेत. या भरतीच्या मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरलेले सर्व उमेदवार IBPS च्या अधिकृत वेबसाइट ibps.in वर जाऊन त्यांचे प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात. 

असे डाउनलोड करता येणार प्रवेशपत्र 

IBPS Clerk Mains Admit Card डाउनलोड करण्यासाठी, प्रथम अधिकृत वेबसाइट ibps.in वर जा. वेबसाइटच्या होम पेजवर CRP CLERKS-XIV खाली दिलेल्या प्रवेशपत्र लिंकवर क्लिक करा. आता नवीन पृष्ठावर, नोंदणी क्रमांक/रोल क्रमांक आणि पासवर्ड/जन्मतारीख प्रविष्ट करा आणि लॉगिन बटणावर क्लिक करा. यानंतर, तुमचे प्रवेशपत्र स्क्रीनवर उघडेल, ते डाउनलोड करा आणि त्याची प्रिंटआउट घ्या.

परीक्षेच्या दिवशी परीक्षा केंद्रावर प्रवेशपत्राची प्रत आणि वैध मूळ ओळखपत्र (आधार कार्ड/पॅन कार्ड/ड्रायव्हिंग लायसन्स/मतदार ओळखपत्र) सोबत बाळगणे आवश्यक आहे. ओळखपत्र आणि प्रवेशपत्राशिवाय तुम्हाला परीक्षा हॉलमध्ये प्रवेश दिला जाणार नसल्याचे आयबीपीएस कडून सांगण्यात आले आहे. या भरती प्रक्रियेद्वारे देशभरातील राज्यांमध्ये लिपिकाच्या एकूण 6 हजार 128 रिक्त पदांवर उमेदवारांची नियुक्ती केली जाईल. अधिक आणि सर्व माहिती मिळवण्यासाठी उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळाला वेळोवेळी भेट देण्याचा सल्ला आयबीपीएस संस्थेकडून देण्यात आला आहे.