सर रागावले, विद्यार्थ्यांची सटकली; शिक्षकाच्या गर्भवती पत्नीसह 2 मुलींची केली निर्घृण हत्या..

मौलाना इब्राहिम हे गंगनोली गावातील मशिदीत विद्यार्थ्यांना धार्मिक शिक्षण देत होते. त्यांच्या पत्नी इसराना (गर्भवती), मुलगी सोफिया आणि सुमय्या यांचा या हल्ल्यात मृत्यू झाला. घटनेच्या दिवशी मौलाना इब्राहिम देवबंद येथे तालिबानचे परराष्ट्र मंत्री आमीर खान मुक्ताकी यांना भेटण्यासाठी गेले होते. घरी परतल्यानंतर त्यांना मशिदीच्या वरच्या खोलीत पत्नी आणि दोन्ही मुलींचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळले.

सर रागावले, विद्यार्थ्यांची सटकली; शिक्षकाच्या गर्भवती पत्नीसह 2 मुलींची केली  निर्घृण हत्या..

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

गुरु शिष्याच्या नात्याला काळिमा फासणारी घटना उत्तर प्रदेशात (UP Crime News) घडली आहे. वर्गात शिक्षक रागवल्याचा राग मनात धरून दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांनी शिक्षकाच्या गर्भवती पत्नीसह (Brutal murder of teacher's wife) दोन चिमुकल्या मुलींची निर्घृण हत्या केल्याच्या घटनेने संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. हा रक्तरंजित थरार बागपत जिल्ह्यातील गंगनोली (Bagpat District Gangnoli Village News) गावात घडला आहे. प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता, पोलिसांनी अवघ्या चार तासांत दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे.

पुण्यात मनसे विद्यार्थी सेना आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांच्यात तुफान राडा..

मौलाना इब्राहिम हे गंगनोली गावातील मशिदीत विद्यार्थ्यांना धार्मिक शिक्षण देत होते. त्यांच्या पत्नी इसराना (गर्भवती), मुलगी सोफिया आणि सुमय्या यांचा या हल्ल्यात मृत्यू झाला. घटनेच्या दिवशी मौलाना इब्राहिम देवबंद येथे तालिबानचे परराष्ट्र मंत्री आमीर खान मुक्ताकी यांना भेटण्यासाठी गेले होते. घरी परतल्यानंतर त्यांना मशिदीच्या वरच्या खोलीत पत्नी आणि दोन्ही मुलींचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळले. ही दृश्ये पाहून मौलाना आणि गावकरी हादरले.

पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळ गाठले. मृतदेह ताब्यात घेऊन फॉरेन्सिक पथकाने तपास सुरू केला. तपासात धक्कादायक खुलासा झाला की मौलानाचे दोन अल्पवयीन विद्यार्थी या हत्येमागे होते. वर्गात मौलानाने या विद्यार्थ्यांना शिक्षा केली होती. याचा राग मनात ठेवून त्यांनी हातोडी आणि चाकूने मौलानाच्या कुटुंबावर हल्ला केला. सर्वांत पहिले गर्भवती इसरानावर वार केले नंतर सोफिया आणि सुमय्यालाही संपवले. या दोन्ही लहान मुलींचे वय 5 वर्ष आणि 2 वर्ष असे होते.