"...तर आम्हीही मनसे स्टाईलने उत्तर देऊ; " अमित ठाकरेंचा एबीव्हीपी संघटनेला इशारा...

"विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवणे हे आमचे ध्येय आहे. पण आमच्यात येऊन कोणी बोट घातलं, तर आम्ही हात घालू. कायदा सर्वांसाठी समान असावा; जर आम्ही ‘बॉयकॉट ABVP, जॉईन मनविसे’ असं लिहिलं तर त्यांना चालेल का? पोलिस आयुक्तांवर दबाव असेल, पण आम्हीही दबाव आणू शकतो हे त्यांनी लक्षात घ्यावं. आयुक्तांनी त्यांचं काम प्रामाणिकपणे केलं, तर आम्हाला मनसे स्टाईलने उत्तर देण्याची वेळ येणार नाही." असं अमित ठाकरे म्हणाले.

"...तर आम्हीही मनसे स्टाईलने उत्तर देऊ; " अमित ठाकरेंचा एबीव्हीपी संघटनेला इशारा...

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

"मी काल येणार होतो पण आयुक्तांची भेट आज मिळाली म्हणून आलो. काही पक्ष आमच्या कामात अडथळे आणत आहेत, हे तिसऱ्यांदा घडले आहे. ते सत्तेत असल्याने दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत, पण आम्हाला त्याचा काही फरक पडत नाही. मी माझ्या मुलांच्या मागे ठामपणे उभा आहे, ते उत्तम काम करत आहेत. आमच्या विद्यार्थ्यांच्या कामात कोणी अडथळा आणण्याचा प्रयत्न केला, तर आम्हीही मनसे स्टाईलने उत्तर देऊ." असा स्पष्ट इशारा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे (Maharashtra Navnirman Student Sena) अध्यक्ष अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी एबीव्हीपी संघटनेला (ABVP organization) दिला आहे.

मृदा व जलसंधारण भरती घोटाळ्यात नाव असलेल्या अधिकार्‍याला सरकारकडून पुरस्कार जाहीर..

"विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवणे हे आमचे ध्येय आहे. पण आमच्यात येऊन कोणी बोट घातलं, तर आम्ही हात घालू. कायदा सर्वांसाठी समान असावा; जर आम्ही ‘बॉयकॉट ABVP, जॉईन मनविसे’ असं लिहिलं तर त्यांना चालेल का? पोलिस आयुक्तांवर दबाव असेल, पण आम्हीही दबाव आणू शकतो हे त्यांनी लक्षात घ्यावं. आयुक्तांनी त्यांचं काम प्रामाणिकपणे केलं, तर आम्हाला मनसे स्टाईलने उत्तर देण्याची वेळ येणार नाही." असं अमित ठाकरे म्हणाले.

काल पुण्यातील वाडिया कॉलेजमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची शाखा सुरू करण्यात आली आहे. पण या कार्यक्रमाच्या ठिकाणी आखिल भारतीय विद्यार्थी सेना अर्थात एबीव्हीपीने पोस्टर लावल्याने दोन्ही संघटनांमध्ये वाद उफाळला. यानंतर आज अमित ठाकरेंनी आज पुण्यात आयुक्तांची भेट घेतली आणि एबीव्हीपीला धमकी वजा इशारा दिला. तुम्ही बोट लावलं, तर आम्ही हात घालणार. अॅक्शनला रिअॅक्शन मिळणारच असा इशारा अमित ठाकरेंनी दिला आहे.