१० वी उत्तीर्णांना नोकरीची सुवर्णसंधी, भारतीय तटरक्षक दलामध्ये भरती सुरू

या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून 10 वी उत्तीर्ण असणं अनिवार्य आहे. तसेच, उमेदवारांकडे मोटर ट्रान्सपोर्ट पदासाठी हॅव्ही आणि लाइट मोटर वाहनाचं वैध ड्रायव्हिंग लायसन्स आणि त्यांना ड्रायव्हिंग मोटर वाहन चालवण्याचा 2 वर्षांचा अनुभव असणं गरजेचं आहे.

१० वी उत्तीर्णांना नोकरीची सुवर्णसंधी, भारतीय तटरक्षक दलामध्ये भरती सुरू

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी सरकारी नोकरीची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. भारतीय तटरक्षक दल (इंडियन कोस्ट गार्ड) कडून मोटर ट्रान्सपोर्ट आणि मल्टी टास्किंग स्टाफ पदांसाठी (Motor Transport and Multi Tasking Staff Posts) भरती जाहीर (Recruitment process announced) करण्यात आली आहे. या भरतीसाठी अर्जाची प्रक्रिया सुरू झाली असून इच्छुक आणि पात्र उमेदवार 11 नोव्हेंबर 2025 पर्यंत अर्ज करू शकतात. या भरतीच्या माध्यमातून मोटर ट्रान्सपोर्ट ड्रायव्हर, मल्टी टास्किंग स्टाफमध्ये प्यून, पॅकर आणि ड्राफ्टी या पदांसाठी (Motor Transport Driver, Peon, Packer and Draftee posts in Multi Tasking Staff) नियुक्ती केली जाणार आहे.

दत्तात्रय वारे गुरुजी यांची पुन्हा बदली; शिक्षण मंत्री काय म्हणाले...

या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून 10 वी उत्तीर्ण असणं अनिवार्य आहे. तसेच, उमेदवारांकडे मोटर ट्रान्सपोर्ट पदासाठी हॅव्ही आणि लाइट मोटर वाहनाचं वैध ड्रायव्हिंग लायसन्स आणि त्यांना ड्रायव्हिंग मोटर वाहन चालवण्याचा 2 वर्षांचा अनुभव असणं गरजेचं आहे. इतर पदांवर सुद्धा भरती होण्यासाठी संबंधित क्षेत्रात 2 वर्षांचा अनुभव ग्राह्य धरण्यात येणार आहे. याशिवाय, लास्कर फर्स्ट क्लास पदासाठी बोटीत 3 वर्षांची सर्व्हिस असणं आवश्यक आहे. या भरतीसंदर्भात अधिक माहिती मिळवण्यासाठी उमेदवार भरतीचं अधिकृत नोटिफिकेशन तपासू शकतात.

मोटर व्हेहिकल ड्रायव्हर आणि मल्टी टास्किंग स्टाफ पदांसाठी 18 ते 27 वर्षे वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. तसेच, लास्कर पदांसाठी उमेदवारांचं कमाल वय 30 वर्षे असणं अनिवार्य आहे. याशिवाय, सरकारी नियमांनुसार राखीव प्रवर्गातील उमेदवारांना उच्च वयोमयदित सूट देण्यात येणार आहे.