पुणे विद्यापीठातील मुलांच्या वसतिगृहाला आग, दोन महिन्यातील दुसरी घटना
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुलांचे वसतिगृह क्रमांक - ८ च्या इमारतीला रात्री ७ वाजताच्या दरम्यान अचानक आला आग लागली. यावेळी सर्व मुले वसतिगृहात उपस्थित होती. आग लागल्याचे समजताच मुले इकडे तिकडे सैरावैरा पळत सुटली. वेळीच बाहेर पडल्याने कोणतीही जिवित हाणी झाली नाही.

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (Savitribai Phule Pune University) मुलांचे वसतिगृह क्रमांक - ८ (Fire at Boys hostel) च्या इमारतीला बुधवारी रात्री ७ वाजताच्या दरम्यान अचानक आला आग लागली. यावेळी सर्व मुले वसतिगृहात उपस्थित होती. आग लागल्याचे समजताच मुले इकडे तिकडे सैरावैरा पळत सुटली. वेळीच बाहेर पडल्याने कोणतीही जिवित हाणी झाली नाही. या निमित्ताने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर (Student safety issue on the agenda) आला आहे. गेल्या दोन महिन्यांत विद्यापीठाच्या आवारात (Second incident in two months) आगीची ही दुसरी घटना आहे.
मुलांच्या वसतिगृहाला आग कशी लागली याची खात्री अजून पटलेली नाही. मात्र विजेमुळे आग लागली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. गेल्या महिन्यात, कुलसचिवांच्या निवासस्थानासमोरील जंगलात आग लागली होती, जी अग्निशमन दलाने आटोक्यात आणली. ती घटना ताजी असतानाच आता ही दुसरी घटना घडली आहे. या घटनेमुळे विद्यापीठातील अग्निसुरक्षा उपायांबद्दल पुन्हा एकदा चिंता निर्माण झाली आहे.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (ABVP) विद्यापीठ प्रशासनावर जोरदार टीका केली आहे. तसेच अग्निसुरक्षा व्यवस्थेच्या अभावावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. "विद्यापीठात अग्निशमन दलाची सुविधा नाही. नवनियुक्त मुख्य वसतिगृह अधिकारी आणि अतिरिक्त वसतिगृह अधिकाऱ्यांनी जबाबदारी घ्यावी आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी योग्य उपाययोजना राबवाव्यात," असे अभाविपचे प्रतिनिधी शिवा बरोले म्हणाले.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी ठोस पावले उचलली गेली नाहीत तर अभाविप प्रशासनाविरुद्ध तीव्र निषेध करेल, असा इशाराही बरोले यांनी दिला. वारंवार आगीच्या घटना घडत असूनही, विद्यापीठाने अद्याप समर्पित अग्निसुरक्षा यंत्रणा स्थापन केलेली नाही. विद्यार्थी आणि संघटना आता जीवित आणि मालमत्तेला होणारे संभाव्य धोके टाळण्यासाठी त्वरित कारवाई करण्याची मागणी करत आहेत.