पुस्तकप्रेमींसाठी पर्वणी! पुण्यात रंगणार १३ ते २१ डिसेंबर रोजी भव्य 'पुस्तक महोत्सव'

भारतीय भाषांमधील पुस्तकांची ८०० दालने, सहा दिवसांचा 'पुणे लिट फेस्ट', बालवाचकांसाठी 'चिल्ड्रन कॉर्नर', लेखकांसाठी 'ऑर्थर्स कॉर्नर', दररोज विविध पुस्तकांची प्रकाशने, सांस्कृतिक कार्यक्रम आदींचा समावेश यंदाच्या महोत्सवात असेल, अशी माहिती राष्ट्रीय पुस्तक न्यासाचे संचालक युवराज मलिक आणि पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पुस्तकप्रेमींसाठी पर्वणी! पुण्यात रंगणार १३ ते २१ डिसेंबर रोजी भव्य 'पुस्तक महोत्सव'

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

महाराष्ट्रातील सर्वात भव्य पुस्तक महोत्सव असणारा 'पुणे पुस्तक महोत्सव' (Pune Book Festival) यंदा १३ ते २१ डिसेंबर या कालावधीत फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर (Ferguson College Ground) आयोजित करण्यात येणार आहे. महोत्सवाचे हे सलग तिसरे वर्ष असून मागील दोन वर्षांपेक्षा यंदा त्याची व्याप्ती वाढली असल्याची माहिती मुख्य संयोजक राजेश पांडे (Rajesh Pandey) यांनी दिली. त्यामुळे हा पुस्तक महोत्सवात यावर्षीही पुस्तकप्रेमींसाठी भरगच्च साहित्यिक कार्यक्रमांची पर्वणी असणार आहे.

राज्यातील कंत्राटी शिक्षकांची दिवाळी गोड, २०२५-२६ साठीचे अनुदान वितरीत

भारतीय भाषांमधील पुस्तकांची ८०० दालने, सहा दिवसांचा 'पुणे लिट फेस्ट', बालवाचकांसाठी 'चिल्ड्रन कॉर्नर', लेखकांसाठी 'ऑर्थर्स कॉर्नर', दररोज विविध पुस्तकांची प्रकाशने, सांस्कृतिक कार्यक्रम आदींचा समावेश यंदाच्या महोत्सवात असेल, अशी माहिती राष्ट्रीय पुस्तक न्यासाचे संचालक युवराज मलिक आणि पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या महोत्सवाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे महापालिका, डेक्कन एज्युकेशन सोसायटी आणि समर्थ युवा फाउंडेशनचे सहकार्य लाभले आहे. यंदा महोत्सवाला १५ लाखांहून अधिक वाचकांनी भेट देण्याची अपेक्षा असून पुस्तक विक्रीतून काही कोटींची उलाढाल होण्याचा अंदाज आहे, असे पांडे यांनी सांगितले.

गतवर्षी महोत्सवात पुस्तकांची सुमारे ७०० दालने होती, यंदा ती संख्या वाढून ८०० पर्यंत गेली आहे. यंदा 'पुणे लिट फेस्ट' सहा दिवसांचा होणार असून यातील तीन दिवस मराठी साहित्यासाठी राखीव असतील. या 'लिट फेस्ट'मध्ये देशभरातील नामांकित साहित्यिक, पत्रकार, कलाकारांना आमंत्रित करण्यात येत आहे, असे मलिक यांनी सांगितले.