शाळेशेजारची पानटपरी हटवली म्हणून हेरंब कुलकर्णी यांच्यावर जीवघेणा हल्ला

हेरंब कुलकर्णी यांच्यावर शनिवारी (दि. ७) तिघा तरूणांनी लोखंडी रॉडने हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात त्यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे.

शाळेशेजारची पानटपरी हटवली म्हणून हेरंब कुलकर्णी यांच्यावर जीवघेणा हल्ला

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ व लेखक हेरंब कुलकर्णी (Heramb Kulkarni) यांच्यावरील जीवघेण्या हल्ल्याचे कारण समोर आले आहे. कुलकर्णी यांनी त्यांच्या शाळेशेजारील पानटपरी हटविण्यासाठ महापालिकेला पत्र दिले होते. त्याआधारे पालिकेनेही पानटपरी काढली. या रागातून पानटपरी चालकाने इतरांना सांगून कुलकर्णी यांच्यावर हल्ला केल्याचे स्पष्ट झाले आहे. अहमदनगर पोलिसांनी (Ahmednagar Police) याप्रकरणी तिघांना अटकही केली आहे.

 

हेरंब कुलकर्णी यांच्यावर शनिवारी (दि. ७) तिघा तरूणांनी लोखंडी रॉडने हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात त्यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे. ते अहमदनगर शहरातील सिताराम सारडा विद्यालयात मुख्याध्यापक आहेत.शाळेतून सहकारी शिक्षकाच्या दुचाकीवरून घरी परतत असतानाच हा हल्ला झाला.

सीसीटीव्हीत हल्लेखोर दिसत असतानाही…! सुप्रिया सुळे यांची सरकारवर टीका, हेरंब कुलकर्णींची घेतली भेट

 

दरम्यान, तक्रार देऊन दोन दिवस उटले तरी पोलिसांकडून कारवाई होत नसल्याने कुलकर्णी यांच्या पत्नी प्रतिमा यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनीही त्यांची घरी जाऊन भेट घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची विचारपूस करत पोलिसांना तातडीने दोषींवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

 

आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथक नेमले आहे. या पथकाने गुन्हा घडलेल्या ठिकाणी तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केल्यानंतर तसेच इतर माहितीच्या आधारे हा गुन्हा चैतन्य सुनिल सुडके याने व त्याच्या साथीदारांनी मिळून केल्याचे समोर आले. चैतन्यकडे अधिक चौकशी केल्यानंतर पानटपरीचे कारण आले.

 

चैतन्यचा मित्र अक्षय विष्णु सब्बन याची शाळेजवळ पानटपरी होती.ही पानटपरी अतिक्रमणामध्ये येत असल्याने कुलकर्णी यांनी ती हटवण्याबाबत महापालिकेत अर्ज दिला होता. त्यानुसार पालिकेने पानटपरी हटवली होती.त्याचा राग मनात धरून अक्षयच्या सांगण्यावरून चैतन्य, सनि जगधने व इतर दोघांनी कुलकर्णी यांच्यावर हल्ला केल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी अक्षय सब्बन, चैतन्य सुडके आणि एका अल्पवयीन मुलाला अटक केल्याची माहिती अहमदनगर पोलिसांनी दिली.   

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/GXLBZGdPxQ7FzGBg6RD26k