शाळांच्या कागदपत्रांची तपासणी वेगात; २४ तारखेपर्यंतच मुदत

शिक्षण विभाग प्राथमिक पुणे महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाचे (प्राथमिक) सहायक प्रशासकीय अधिकारी जयेश शेंडकर यांनी सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना पत्र पाठवून कागदपत्रे सादर करण्याच्या सुचना दिल्या आहेत.

शाळांच्या कागदपत्रांची तपासणी वेगात; २४ तारखेपर्यंतच मुदत
Fake Certificate

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

शिक्षण आयुक्त सुरज मांढरे (Education Commissioner Suraj Mandhare) यांनी राज्यभरातील सर्व खाजगी अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित, स्वयं अर्थसहाय्यित शाळांची (Schools) कागदपत्रे तपासण्याचे आदेश दिले आहेत. ज्या शाळांकडे आवश्यक कागदपत्रे नसतील, त्यांना अनधिकृत (Fake Schools) घोषित करून शाळा बंद केल्या जाणार आहेत. यापूर्वी काही शाळा बंदही केल्या आहेत. त्यानुसार पुणे महापालिकेच्या (PMC) कार्यक्षेत्रातील शाळांनाही नोटिसा बजावल्या जात असून आवश्यक कागदपत्रे तपासणीसाठी २४ मेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. (Notices to all schools by PMC Education Department)

शिक्षण विभाग प्राथमिक पुणे महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाचे (प्राथमिक) सहायक प्रशासकीय अधिकारी जयेश शेंडकर यांनी सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना पत्र पाठवून कागदपत्रे सादर करण्याच्या सुचना दिल्या आहेत. पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या आदेशानुसार पुणे महानगरपालिका हद्दीतील राज्य (State) बोर्डाच्या तसेच इतर (Other) बोर्डाच्या शाळांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात येत आहे. शाळांनी यापूर्वी दोन प्रतीत शाळा मान्यतेची कागदपत्रे विभागीय कार्यालयात सादर केलेली आहेत.

हेही वाचा : ‘स्त्री सक्षमीकरणाचा वसा’ - महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था

ज्या शाळांकडे शासन मान्यता परवानगी पत्र, शिक्षण उपसंचालक परवानगी पत्र, प्रथम मान्यता पत्र व स्वमान्यता प्रमाणपत्र इत्यादी बाबींची तपासणी करुन आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करीत नसल्यास या शाळांना याबाबत कारणे दाखवा नोटीस देण्यात येत आहे. तसेच शाळांनी नमूद त्रुटी कागदपत्रांची उपलब्धता असल्यास तात्काळ पूर्तता करणे व ही कागदपत्रे शाळेकडे का उपलब्ध नाहीत? याबाबत २४ मेपर्यंत रोजी अखेर मुख्याध्यापकांनी आपला लेखी खुलासा सहाय्यक प्रशासकीय अधिकारी यांच्या विभागीय कार्यालय येथे समक्ष सादर करण्यास सांगण्यात आले आहे. त्यानंतर संबंधित शाळांबाबत पुढील कार्यवाही केली जाणार आहे.

सहाय्यक प्रशासकीय अधिकारी यांचे कार्यालयाकडून मंगळवारी सकाळी १० ते ५ या कालावधीत सर्व शाळांमध्ये कागदपत्रे त्रुटींची नोटिसा बजावण्यात येतील. नोटीस बजावण्यासाठी विभागीय कार्यालयाचा सेवक शाळेत समक्ष जाणार आहेत. त्यामुळे या अनुषंगाने सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांनी मंगळवारी १० ते ५ या कालावधीत कार्यालयातील जबाबदार व्यक्ती यांना शाळेत उपस्थित राहणेबाबत आदेशित करावे, अशा सुचना सर्व शाळांना देण्यात आल्या आहेत.

दरम्यान, कागदपत्रांची तपासणी करून येत्या शैक्षणिक वर्षात अनधिकृत शाळा सुरू राहिल्यास, त्यामध्ये विद्यार्थ्यांचे प्रवेश झाल्यास सहायक प्रशासकीय अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा पुणे महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या (प्राथमिक) प्रशासकीय अधिकारी डॉ. मीनाक्षी राऊत यांनी दिला आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/BKV1cdTvHMDAsv3o1G8AB2