नववी ते उच्च शिक्षणापर्यंतच्या अभ्यासक्रमात निवडणूक प्रक्रियेचा होणार समावेश 

सर्व राज्याना आणि उच्च शैक्षणिक संस्थांना युजीसीने  पाठवले पत्र 

नववी ते उच्च शिक्षणापर्यंतच्या अभ्यासक्रमात निवडणूक प्रक्रियेचा होणार समावेश 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

शालेय शिक्षणापासूनच विद्यार्थ्यांना जागरूक करण्याच्या उद्देशाने निवडणूक प्रक्रियेचा (Election process) अभ्यासक्रमात समावेश (included in the curriculum) करण्यात येत आहे. यासाठी शिक्षण मंत्रालय आणि भारत निवडणूक आयोग यांच्यात करार (Agreement between Ministry of Education and Election Commission of India ) करण्यात आला आहे. यासंदर्भात विद्यापीठ अनुदान आयोगाचे (UGC) सचिव मनीष जोशी (Secretary Manish Joshi) यांच्या वतीने सर्व राज्ये आणि उच्च शैक्षणिक संस्थांना पत्र पाठवण्यात आले आहे.

शाळांपासून उच्च शैक्षणिक संस्थांपर्यंतच्या विद्यार्थ्यांना लोकशाही, मतदान आदी प्रक्रिया समजावून सांगण्यासाठी योग्य अभ्यासक्रम तयार करण्यात येणार आहे .या विषयाची परीक्षा घेण्यात येणार आहे. या विषयाचे गुण शालेय  प्रमाणपत्र आणि पदवीमध्ये जोडले जाणार आहेत. UGC च्या पत्रात अभ्यासक्रमात निवडणूक प्रक्रियेचा समावेश करण्याविषयी आणि त्याच्या आधारावर श्रेय देण्याविषयी सूचना देण्यात आल्या आहेत. हा विषय शिकवण्यासाठी शिक्षक प्राध्यापकांना ऑनलाईन किंवा ऑफलाईन ट्रेनिंग राबवणे, विद्यार्थ्यांमध्ये मतदानाविषयी आणि एकूणच प्रक्रियेविषयी जागृती अभियान राबवणे आदी सूचना पात्रात देण्यात आल्या आहेत.

हेही वाचा : UGC कडून प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी मार्गदर्शक तत्वांना मंजुरी

निवडणूक प्रक्रियेमध्ये, विद्यार्थ्यांना EVM, VVPAT, भारतीय निवडणूक आयोगाचे मोबाइल अॅप, बॅलेट युनिट, मतदान विभाग, कंट्रोल युनिट, पीठासीन अधिकारी, दोन मतदान अधिकारी, पोलिंग एजंट, मतदान कप्पे, NOTA इत्यादींबद्दल देखील शिकवले जाईल. निवडणूक प्रक्रियेची प्रत्येक माहिती त्यांना अवगत व्हावी हा त्यामागचा उद्देश आहे. याशिवाय निवडणूक प्रक्रिया समजावून सांगण्यासाठी शैक्षणिक संस्थांमध्ये मॉक पोल म्हणजेच निवडणूक चाचणीही घेतली जाणार आहे.तसेच येत्या २५ जानेवारी रोजी शैक्षणिक संस्थांमध्येही राष्ट्रीय मतदार दिन साजरा केला जाणार आहे, असेही या पात्रात नमूद करण्यात आले आहे.