लातूरमध्ये पुन्हा दुष्काळ ! उन्हाचा पारा चढल्याने शाळा सकाळी भरणार 

विविध संघटनांकडून मागणी करण्यात आली होती. त्यानुसार शिक्षण विभागाने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन सोमवारपासून सकाळी ८ ते १ या वेळेत शाळा भरविण्याचा निर्णय घेतला आहे.

लातूरमध्ये पुन्हा दुष्काळ ! उन्हाचा पारा चढल्याने शाळा सकाळी भरणार 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

सध्या लातूर जिल्ह्यासह (Latur District) राज्यात उन्हाचा पारा (summer mercury) चांगलाच वाढला आहे. त्यापार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शाळा सकाळच्या सत्रात भरविण्यात (school will be held morning session) येणार आहेत. त्यासाठी विविध सामाजिक संघटनांकडून मागणी करण्यात आली होती. त्यानुसार शिक्षण विभागाने (Department of Education) परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन सोमवारपासून सकाळी ८ ते १ या वेळेत शाळा भरविण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबाबतच्या पत्राद्वारे मुख्याध्यापकांना सूचना करण्यात आल्या आहेत. 

सध्या मार्च महिन्याचा दुसरा आठवडा सुरु आहे. मात्र, जिल्ह्यात उन्हाचा पारा एवढा वाढला आहे की, वाढत्या तापमानाच्या झळा लातूरकरांना पेलवेना झाल्यात. त्यात जिल्ह्याच्या पाचवीला पुजलेली पाणीटंचाई यामुळे लातुर आतापासूनच दुष्काळाने होरपाळून निघत आहे. ही बाब लक्षात घेऊन शिक्षण विभागने शाळा सकाळच्या सत्रात भरवण्याचा निर्णय घेतला आहे. 

सोमवार ते शुक्रवार सकाळी ८ ते २ तर शनिवारी ७ः३० ते ११ या वेळेत शाळा भरणार आहे. याबाबत तासिकांचे वेळापत्रकही शिक्षण विभागाने मुख्यध्यापकांना पाठविले असल्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे, माध्यमिक शिक्षणाधिकारी नागेश मापारी यांनी सांगितलं आहे.