महिला प्राध्यापकांसाठी UGC चे नवीन शेरणी नेटवर्क 

महिला प्राध्यापकांसाठी राष्ट्रीय स्तरावरील कौशल्य निर्माण करणे, कार्य आणि संशोधन अनुभवांची देवाणघेवाण हे उद्देश डोळ्यासमोर ठेवून विद्यापीठ अनुदान आयोगाने रिसर्च नेटवर्क इन इंडिया (शेरणी) हे नेटवर्क सुरू केले आहे.

महिला प्राध्यापकांसाठी UGC चे नवीन शेरणी नेटवर्क 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

देशातील महिला प्राध्यापकांसाठी (Women Professors) राष्ट्रीय स्तरावरील कौशल्य निर्माण करणे, कार्य आणि संशोधन (Exchange of work and research) अनुभवांची देवाणघेवाण करणे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) ने (She Research Network in India) (शेरणी) हे नेटवर्क सुरू केले आहे.  हे नेटवर्क UGC-INFLIBNET ने लाँच केले आहे. 

या  नेटवर्कच्या माध्यमातून  81 हजार 818 नोंदणीकृत महिला शास्त्रज्ञ आणि इतर क्षेत्रातील शैक्षणिक सदस्यांना जोडण्यात येणार आहे. यासह या नेटवर्कमध्ये 6, लाख 75 हजार 313 प्रकाशने आणि 11 हजार 543 पेटंट देखील समाविष्ट असतील. याच्या मदतीने विद्यार्थी त्यांच्याशी संपर्क साधून नवीन गोष्टी शिकू शकतील आणि इतर शास्त्रज्ञांशी बोलून इतर तपशील देखील मिळवू शकतील. sherni.inflibnet.ac.in ही या प्लॅटफॉर्मची वेबसाइट आहे. 

या संदर्भात UGC चे अध्यक्ष प्रा. जगदीश  कुमार म्हणाले, " आयोग महिला शास्त्रज्ञ आणि शिक्षकांच्या कामगिरीसाठी समान प्रतिनिधित्व आणि एक्सपोजरची हमी देऊ इच्छित आहे. या नेटवर्कच्या माध्यमातून महिला शास्त्रज्ञ, संशोधक आणि प्राध्यापकांच्या पुढील पिढीला प्रेरणा देण्याचे काम केले जाईल जेणेकरून या क्षेत्रातील महिलांचा सहभाग आणखी वाढू शकेल."