धक्कादायक : आदिवासी आश्रम शाळातील विद्यार्थ्यांना स्वत:च्या हातानेच बनवावे लागते जेवण

आदिवासी विकास प्रक्लपातील शाळांवरून विरोधकांनी गावितांना घेरले

धक्कादायक : आदिवासी आश्रम शाळातील विद्यार्थ्यांना स्वत:च्या हातानेच बनवावे लागते जेवण
Vijaykumar Gavit, Pradnya Satav

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क : 

महाराष्ट्रातील आदिवासी आश्रम शाळांमध्ये विद्यार्थ्यांची दयनीय अवस्था असल्याचे चित्र आहे. काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांना स्वता:च्या हाताने स्वयंपाक करावा लागत असून काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांना राहण्याची व्यवस्थाच नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. विद्यार्थ्यांना एकाच हॉलमध्ये राहावे लागते. काहींना झोपण्यासाठी गाद्या आहे तर काहींना जमिनीवर खाली झोपवे लागते असल्याची माहिती शुक्रवारी विधान परिषदेत मांडली गेली. त्यामुळे सभागृहात एकाच गदारोळ झाला.

कळमनुरी येथील आदिवासी आश्रम शाळा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पावरून आज (दि.5) विधान परिषदेत काँग्रेसच्या (Congress) आमदार प्रज्ञा सातव (Pradnya Satav) यांनी प्रश्न उपस्थित केला होता. यावेळी अनेक आमदारांनी आश्रम शाळांविषयी विविध प्रश्न उपस्थित करत आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित (Dr. Vijaykumar Gavit) यांना धारेवर धरले.

हेही वाचा : CA फाउंडेशन कोर्सच्या डिसेंबर २०२३ सत्राचे प्रवेश पत्र प्रसिद्ध   

सातव म्हणाल्या, ''कळमनुरी येथली आदिवासी शाळांमध्ये मुलांना अनेक सुविधांपासून वंचित ठेवण्यात आले आहे. या शाळांमधील काही विद्यार्थी आणि पालक माझ्याकडे आले होते. येथे मुलांना स्वत:च स्वयंपाक करावा लागतो. येथे सर्व ऊसतोड मजुरांची मुले शिकतात. अनेक शाळांमध्ये खोल्याचे बांधकाम झालेले नाही, सर्व मुलांना एकाच हॉलमध्ये ठेवले जाते,'' असे त्यांनी सांगितले. 

सातव यांच्या प्रश्नाला उत्तर देता गावित यांनी सर्व शाळांची तपासणी केलेली आहे. चौकशीमध्ये या शाळांमध्ये सर्व सुविधा उपलब्ध असल्याचे निदर्शनास आले आहे. मात्र, सावत यांनी प्रश्न उपस्थित केला आहे, त्यावर मंत्री गावित म्हणाले, 4 डिसेंबरला चौकशी केली आहे. प्रकल्प कार्यालयामार्फत चौकशी करत असतो. त्या चौकशीमध्ये या सहा शाळा पात्र झाल्या आहेत. चौकशी केल्यानंतर तेथे सर्व सुविधी उपलब्ध असल्याचे निदर्शनास आले. त्या शाळाचा निकालही चांगला आहे. तरी सुद्धा सातव यांनी चौकशीची मागणी केला आहे, त्यामुळे पुन्हा चौकशी केली जाईल, असे त्यांनी सांगितले. 

हेही वाचा : सांगा... किती गुरुजींनी आपले फोटो शाळेत लावले ; शिक्षक संघटना म्हणते एकाही नाही , शासनाने मागवला अहवाल 

त्यावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या शाळांची परिस्थिती पुन्हा सभागृहात सांगितली. दानवे म्हणाले, कळमनुरीतील अनेक शाळांना मी भेट दिली. शिरपुरला, इगतपुरीला मी स्वत: जाऊन आलो आहे. मी जातांना अधिकाऱ्यांना सांगून गेलो होतो. येथे इंग्रजी शाळा आहेत. इंग्रजी शाळा असून सुद्धा इंग्रजीचेच शिक्षक नाहीत. तसेच येथे विद्यार्थ्यांना स्वता: च स्वयंपाक करावा लागतो. स्वयंपाकी नियमीत गैरहजर राहत असल्यामुळे मुलांना स्वता: स्वयंपाक करतात. 

येथे मुलांना कुठल्याच सुविधा नाहीत, एकाच हॉलमध्ये मुलं राहतात, त्यांना एकाच खोलीत झोपावे लागते, असे आरोप दानवे यांनी केले. त्यानंतरही चौकशी करतो, असे उत्तर गावित यांनी दिले. त्यानंतर दानवे म्हणाले, या शाळांसंदर्भात अधिकाऱ्यांनी दिलेला अहवाल चुकीचा आहे. शिरपुर, सारणी, डहानू, येथे मी स्वता: जाऊन आलो आहे. व्हिजन पब्लिक स्कूल, हाइटेक पब्लिक स्कूल या शाळांची दानवे यांनी थेट नावे घेतली.