पुस्तकातून झाला 'भारत' शब्दाचा विश्व विक्रम

भारत हा शब्द सुमारे ७ हजार ५०० पुस्तकांनी लिहून, सौदी अरेबियाचा रेकॉर्ड मोडण्यात आला आहे.  

पुस्तकातून झाला 'भारत' शब्दाचा विश्व विक्रम

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या (National Book Trust) वतीने फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित पुणे पुस्तक महोत्सवाच्या निमित्ताने भारत (bharat ) हा शब्द (word Bharat)सुमारे ७ हजार ५०० पुस्तकांनी (Book) लिहून, सौदी अरेबियाचा रेकॉर्ड (A record for Saudi Arabia) मोडण्यात आला आहे.  त्यामुळे पुण्यात भारत शब्दाने विश्वविक्रमाला (The world record )गवसणी घातली आहे. या विश्व विक्रमानंतर आकाशात फुगे सोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

यावेळी नॅशनल बुक ट्रस्टचे अध्यक्ष मिलिंद मराठे, संचालक युवराज मलिक, महोत्सवाचे संयोजक राजेश पांडे, भाजप नेते माधव भांडारी, उद्योजक कृष्कुमार गोयल, आनंद छाजेड, प्रसेनजित फडणवीस, बागेश्री मंठाळकर, राहुल पाखरे, प्राचार्य डॉ. संजय चाकणे आदी उपस्थित होते.

पुणे पुस्तक महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात असून शनिवारपासून त्याची धडाक्यात सुरुवात होणार आहे. त्या अनुषंगाने शुक्रवारी फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर भारत हा शब्द सुमारे ७ हजार ५०० हजार शब्दांनी लिहिण्यात आला. हा शब्द लिहिल्यानंतर , भारताने सौदी अरेबियाचा सात हजार १९१ पुस्तकांचा रेकॉर्ड मोडला. गिनेस बुक ऑफ रेकॉर्डचे अधिकारी स्वप्निल डांगगरिकर यांनी घोषण केल्यानंतर विद्यार्थी, प्राध्यापकासह उपस्थित पुणेकरांनी जल्लोष साजरा केला. या विश्वविक्रमासाठी खडकी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. त्याचबरोबर संस्थेचे प्राध्यापक, प्राचार्य आणि विद्यार्थ्यांनी विशेष मेहनत घेतली. प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांनी विशेष परिश्रम घेतले. 
-------------

पुणे पुस्तक महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बालक - पालक : पालकांनी आपल्या पाल्यांना गोष्टी सांगायच्या आणि भारत शब्द पुस्तकांच्या माध्यमातून लिहायच्या, अशा दोन उपक्रमांची नोंद गिनेस बुक ऑफ रेकोर्डमध्ये झाली आहे. हे पुणेकरांमुळे शक्य झाले. आता पुणेकरांनी पुणे पुस्तक महोत्सवात सहभाग घेऊन, तो यशस्वी करावा. 
- राजेश पांडे, संयोजक , पुणे पुस्तक महोत्सव
--------------

पुणे पुस्तक महोत्सव हा पुणेकरांचा महोत्सव आहे. त्यामुळे त्यात अधिकाधिक विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षक, प्राचार्य आणि नागरिकांनी सहभागी व्हायचे आहे. पुणे हे शिक्षणाचे माहेरघर आहे. त्याला आता पुस्तकांची जोड मिळाली आहे. त्यामुळे पुढील काळात पुणे पुस्तकांचे शहर म्हणून नावारूपाला येईल.
- युवराज मलिक, संचालक, नॅशनल बुक ट्रस्ट
---------------

आपल्या भारताला पुढे नेण्यासाठी पुस्तकांच्या माध्यमातून काम करायचे आहे. पुस्तकांच्या माध्यमातून भारताला ओळखायचे आहे, जाणून घ्यायचे आहे, भारताला समजायचे आहे आणि भारताला तयार करण्यासाठी काम करायचे आहे. त्याचाच एक भाग म्हणून पुणे पुस्तक महोत्सवाला यशस्वी करायचे आहे.
- मिलिंद मराठे, अध्यक्ष, नॅशनल बुक ट्रस्ट