CA फाउंडेशन कोर्सच्या डिसेंबर २०२३ सत्राचे प्रवेश पत्र प्रसिद्ध

काही त्रुटी आढळल्यास विद्यार्थ्यांनी तात्काळ आयसीएआयशी संपर्क साधावा

CA फाउंडेशन कोर्सच्या डिसेंबर २०२३ सत्राचे प्रवेश पत्र प्रसिद्ध
CA Foundation Course

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क : 

इन्स्टिटयूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया (ICAI) ने चार्टर्ड अकाउंटंट (CA) फाउंडेशन कोर्सच्या डिसेंबर २०२३ सत्राच्या परीक्षेचे प्रवेश पत्र प्रसिद्ध केले आहे. विद्यार्थी संस्थेच्या अधिकृत वेबसाइट icai.org वरून त्यांचे प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात.

हॉल तिकिटावरील विद्यार्थ्यांचे तपशील ICAI द्वारे त्यांनी भरलेल्या परीक्षेच्या फॉर्मच्या आधारे प्रकाशित केले जातील. तथापि, प्रवेशपत्र डाउनलोड केल्यानंतर, विद्यार्थ्यांनी त्यावर दिलेली त्यांची वैयक्तिक माहिती तपासावी. यामध्ये काही त्रुटी आढळल्यास विद्यार्थ्यांनी तात्काळ आयसीएआयशी संपर्क साधावा, असे निर्देश संस्थेकडून देण्यात आले आहेत. 

हेही वाचा : सांगा... किती गुरुजींनी आपले फोटो शाळेत लावले ; शिक्षक संघटना म्हणते एकाही नाही , शासनाने मागवला अहवाल

असे करा प्रवेशपत्र डाउनलोड
*  ICAI च्या अधिकृत वेबसाइट icai.org   ला भेट द्या.
*  विद्यार्थी विभागात जा, यानंतर तुम्हाला परीक्षा विभागात जावे लागेल, * जिथे नोव्हेंबर/डिसेंबर 2023 परीक्षांसाठी प्रवेशपत्राची लिंक सक्रिय केली गेली आहे. * या लिंकमध्ये वापरकर्ता आयडी आणि पासवर्डद्वारे लॉग इन करा. *  प्रवेशपत्र डाउनलोड करा प्रिंटआऊट घ्या.