इलेक्शन ड्युटीवरील शिक्षकाचा पुण्यात हृदयविकाराने मृत्यू

राजगुरुनगर तालुक्यात इलेक्शन ड्युटीवर असलेल्या एका शिक्षकाचा हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाला. 

इलेक्शन ड्युटीवरील शिक्षकाचा पुण्यात हृदयविकाराने मृत्यू

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

सध्या राज्यासह देशभरात निवडणुकांचे वारे वाहात आहेत. या निवडणुक कार्यक्रमात (Election program) शिक्षकांना सहभागी करुन घेण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections) या धामधूमीच्या काळात पुण्यातील राजगुरुनगर तालुक्यात इलेक्शन ड्युटीवर (Election Duty) असलेल्या एका शिक्षकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू (Death of a teacher) झाला आहे. 

संतोष जोशी असे या शिक्षकाचे नाव आहे. राजगुरुनगर येथील निवडणुक केंद्रावर कार्य बजावत असताना त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले,मात्र,उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. खेड तालुक्यातील मोई विद्यालयात संतोष जोशी हे शिक्षक म्हणून कार्यरत होते. 

निवडणुकीच्या ड्युटवर असताना संतोष जोशी या शिक्षक कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला असून  निवडणुक आयोगाने संबंधित कर्मचाऱ्यास नुकसान भरपाई द्यावी.तसेच पुढील निवडणूक कामांमध्ये ज्या शिक्षकांचे वय 55 वर्षापेक्षा अधिक आहे, अशा शिक्षक कर्मचार्‍यांना निवडणूक आयोगाने नेमणूक करण्यात येऊ नये, अशी मागणी खेड तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष संजय बोरकर यांनी शिक्षण विभाग व निवडणूक आयोगाकडे केली आहे.