'सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठा'च्या नावाचे कॉपीराईट? चर्चेला तोंड फुटले, सरकारच्या भूमिकेकडे लक्ष

पुणे विद्यापीठाला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे नाव द्यावे, अशी मागणी विविध संघटनांकडून करण्यात आली होती. त्यानंतर सुमारे १० वर्षांपूर्वी विद्यापीठाचा नामविस्तार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे असा करण्यात आला.

'सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठा'च्या नावाचे कॉपीराईट? चर्चेला तोंड फुटले, सरकारच्या भूमिकेकडे लक्ष
SPPU News

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

नवीन शैक्षणिक धोरणाच्या (NEP 2020) अंमलबजावणीच्या पार्श्वभूमीवर पुढील काळात क्लस्टर विद्यापीठांची (Cluster University) स्थापना होणार आहे. मात्र, पुढील काळात या विद्यापीठांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी (Savitribai Phule Pune University) मिळते जुळते नाव देण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नावाचे कॉपीराईट (Copyright) करून घ्यावे, अशी मागणी विद्यापीठाच्या अधिसभेत (Senate) करण्यात आली. त्यावर अधिसभेत समिती स्थापना करण्याबाबत चर्चा करण्यात आली.

 

पुणे विद्यापीठाला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे नाव द्यावे, अशी मागणी विविध संघटनांकडून करण्यात आली होती. त्यानंतर सुमारे १० वर्षांपूर्वी विद्यापीठाचा नामविस्तार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे असा करण्यात आला. विद्यापीठाला नावलौकिक मिळवण्यासाठी अनेक कष्ट घ्यावे लागले. 

पीआरएन ब्लॉकमूळे विद्यार्थी संतप्त ; २०१९ च्या पत्राने घातला गोंधळ

 

विद्यापीठाचे आजी-माजी कुलगुरू, प्राध्यापक, विद्यार्थी, कर्मचारी व अधिकारी यांनी गेल्या ७५ वर्षात केलेल्या मेहनतीमुळे विद्यापीठाच्या नावाचा ब्रॅंड तयार झाला आहे. त्याचा वापर करून कोणीही गैरफायदा घेऊ शकते. त्यामुळे विद्यापीठाच्या नावाचे कॉपीराईट पेटेंट नोंदवावे, असे मत अधिसभा सदस्य सचिन गोरडे पाटील यांनी नुकत्याच झालेल्या अधिसभेत मांडले.

 

पुणे जिल्ह्यात काही विद्यापीठे स्थापन होत असून काही पुढील काळात स्थापन होणार आहेत. त्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे या नावाशी साम्य असणारे नाव दिल्यास विद्यार्थ्यांचा गोंधळ होऊ शकतो. त्यामुळे विद्यापीठाच्या नावाचे कॉपी राईट करून घेणे गरजेचे आहे, असे मत अधिसभेत व्यक्त करण्यात आले. तसेच त्यावर समिती स्थापना करावी, अशी सूचना करण्यात आली.

 शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/GXLBZGdPxQ7FzGBg6RD26k