दहावी बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर; बारावी 10 फेब्रुवारी तर दहावीची परीक्षा 20 फेब्रुवारीपासून
बारावीच्या लेखी परीक्षा 10 फेब्रुवारी ते 18 मार्च या कालावधीत तर प्रात्यक्षिक परीक्षा 23 जानेवारी ते 9 फेब्रुवारी या काळात होणार आहेत. तसेच दहावीच्या लेखी परीक्षा 20 फेब्रुवारी ते 18 मार्च तर प्रात्यक्षिक परीक्षा 2 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारी या दरम्यान होणार आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या इयत्ता दहावी बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर झाल्या असून इयत्ता बारावीची लेखी परीक्षा येत्या 10 फेब्रुवारी पासून सुरू होणार आहे.तर दहावीची लेखी परीक्षा येत्या 20 फेब्रुवारी पासून सुरू होणार आहे. परीक्षेचे विषय निहाय वेळापत्रक राज्य मंडळाच्या संकेतस्थळावर स्वतंत्रपणे जाहीर केले जाणार आहे, असे राज्य मंडळातर्फे प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर करण्यात आले आहे.
राज्य मंडळाच्या पुणे, कोकण, छत्रपती संभाजी नगर, मुंबई, नागपूर, कोल्हापूर, लातूर, अमरावती,नाशिक या नऊ विभागीय मंडळांच्या माध्यमातून दहावी व बारावीच्या परीक्षा घेतल्या जातात. विद्यार्थ्यांना अभ्यासाचे नियोजन करता यावे, या उद्देशाने मंडळातर्फे परीक्षेचे वेळापत्रक लवकर प्रसिद्ध केले जाते.
यंदा बारावीच्या लेखी परीक्षा 10 फेब्रुवारी ते 18 मार्च या कालावधीत तर प्रात्यक्षिक परीक्षा 23 जानेवारी ते 9 फेब्रुवारी या काळात होणार आहेत. तसेच दहावीच्या लेखी परीक्षा 20 फेब्रुवारी ते 18 मार्च तर प्रात्यक्षिक परीक्षा 2 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारी या दरम्यान होणार आहे, असे राज्य मंडळाने प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.
eduvarta@gmail.com