केंद्राची नोकरी, UPSC तर्फे भरती; नो परीक्षा, थेट मुलाखतीद्वारे निवड 

भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ३० मे देण्यात आली आहे. सविस्तर माहितीसाठी आयोगाचे अधिकृत संकेतस्थळ upsconline.nic.in वर अधिसुचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. 

केंद्राची नोकरी, UPSC तर्फे भरती;  नो परीक्षा, थेट मुलाखतीद्वारे निवड 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

तुम्ही केंद्र सरकारची नोकरी करण्याच्या शोधत असाल तर तुमच्यासाठी ही मोठी आणि आनंदाची बातमी आहे. कारण UPSC द्वारे भरती प्रक्रियेची अधिसूचना देखील प्रसिद्ध (Notification released) करण्यात आली आहे. विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडत आहे. त्यासाठी इच्छूक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज (Apply online) मागवण्यात येत आहेत. विशेष म्हणजे यासाठी कोणतीही परीक्षा घेतली जाणार नसून थेट मुलाखतीतून उमेदवारांची (Direct Interview Selection) निवड करण्यात येणार आहे. भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ३० मे देण्यात आली आहे. सविस्तर माहितीसाठी आयोगाचे अधिकृत संकेतस्थळ upsconline.nic.in वर अधिसुचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. 

 केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून (UPSC) ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे लागणार आहेत. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी भरतीसाठी अर्ज करावेत . या भरती प्रक्रियेची सर्वात खास बाब म्हणजे कोणत्याही प्रकारची परीक्षा देण्याचे टेन्शन नाही. थेट मुलाखतीमधून उमेदवाराची निवड ही केली जाणार आहे. 

upsconline.nic.in या साईटवर जाऊन आपण भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकता. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 30 मे 2024 आहे. त्यापूर्वीच इच्छुकांना अर्ज ही करावे लागणार आहेत. केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून ही भरती प्रक्रिया 83 पदांसाठी घेतली जात आहे. 

या भरती प्रक्रियेतून असिस्टंट रिसर्च ऑफिसर, सायंटिफिक ऑफिसर, फॅक्टरी मॅनेजर, मार्केंटिंग ऑफिसर,असिस्टंट कमिशनर, टेस्ट इंजिनिअर, ट्रेंनिंग ऑफिसर, प्रोफेसर अशी विविध पदे भरली जाणार आहेत.  विशेष म्हणजे या पदासाठी 1 लाख 40 हजारांपर्यंत पगार मिळणार आहे.