HSC Result : बारावीचा निकाल जाहीर; राज्याचा निकाल 93.37 टक्के ; निकालाची टक्केवारी वाढली

बारावीच्या निकालात वाढ झाली असून राज्याचा मागील वर्षी निकाल 91.25 टक्के होता. यंदा 93.37 टक्के आहे.

HSC Result : बारावीचा निकाल जाहीर; राज्याचा निकाल 93.37 टक्के ; निकालाची टक्केवारी वाढली
HSC Board Result 2024

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

HSC Board Result 2024: राज्य मंडळातर्फे फेब्रुवारी / मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीचा निकाल जाहीर (12th result declared) झाला असून राज्याचा बारावीचा निकाल 93.37 टक्के लागला आहे. दरवर्षी प्रमाणे निकालात यंदा मुलींनीच बाजी मारली आहे. राज्यात कोकण विभागाचा (Konkan Division)निकाल सर्वाधिक लागला असून मुंबई विभागाचा निकाल सर्वात कमी आहे. मुलींच्या निकालाची टक्केवारी 95.44 टक्के असून मुलांचा निकाल 91.60 टक्के लागला आहे. मुलांच्या निकालाच्या तुलनेत मुलींचा निकाल 3.84 टक्के अधिक आहे. मागील वर्षांच्या तुलनेत यंदा एकूण निकालात 2.12 टक्के वाढ झाली आहे.  

 महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या निकालाची घोषणा राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी (State Board President Sharad Gosavi)यांनी मंगळवारी केली.यावेळी राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओके यांच्यासह राज्य मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

गोसावी म्हणाले, मागील वर्षी राज्याचा निकाल 91.25 टक्के लागला होता.यंदा निकाल 93.37 टक्के लागला आहे. छत्रपती संभाजीनगर विभागातील वाणिज्य शाखेच्या एका विद्यार्थिनीला शंभर टक्के गुण मिळाले आहेत.या विद्यार्थिनीला 582 गुण असून तिला 18 क्रीडा गुण मिळाले आहे.दुपारी एक वाजल्यापासून विद्यार्थ्यांना राज्य मंडळाने जाहीर केलेल्या संकेतस्थळावर निकाल ऑनलाईन पाहण्यासाठी उपलब्ध होणार आहे.  विद्यार्थी खाली दिलेल्या लिंकवर जाऊन निकाल पाहू शकतात.

१. mahresult.nic.in
२. http://hscresult.mkcl.org
३. www.mahahsscboard.in
४. https://results.digilocker.gov.in
५. www.tv9marathi.com
६. http://results.targetpublications.org

----------------------