भारतीय सैन्य रॅली अंतर्गत विविध पदांची भरती सुरू

अधिकृत संकेतस्थळ https://joinindianarmy.nic.in/ वर अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत ८ सप्टेंबर देण्यात आली आहे. 

भारतीय सैन्य रॅली अंतर्गत विविध पदांची भरती सुरू

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

तुम्ही भारतीय सैन्यात (Indian Army) भरती होवू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. भारतीय सैन्य रॅली अंतर्गत अग्नीवीर पदांच्या विविध रिक्त (Agniveer Posts Vacancies) जागांसाठी अर्ज करण्याची अधिसुचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यासाठी इच्छूक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येणार आहेत (Applications will be invited from interested candidates). अधिकृत संकेतस्थळ https://joinindianarmy.nic.in/ वर अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत ८ सप्टेंबर (Deadline 8 September) देण्यात आली आहे. 

भारतीय सैन्य रॅली अंतर्गत “अग्नीवीर (सामान्य कर्तव्य), अग्निवीर तंत्रज्ञ, अग्निवीर ClK/ SKT, अग्निवीर व्यापारी” पदांच्या एकूण 57 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया येत्या 20 जून 2024 पासून सुरु होईल. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 सप्टेंबर आहे.

अग्नीवीर (सामान्य कर्तव्य), अग्नीवीर तंत्रज्ञ, अग्नीवीर CIK/SKL, अग्नीवीर व्यापारी पदांच्या 57 रिक्त जागांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडणार आहे. शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (त्यासाठी मूळ जाहिरात पाहावी) यासाठी १७ वर्ष २ महिने ते २१ वर्ष वयोमर्यादा असणार आहे. सविस्तर माहितीसाठी संकेतस्थळावर उपलब्ध असलेली अधिसुचना पाहावी.