शिक्षकांसाठी 'क्षमता वृध्दी प्रशिक्षण'  दिशा दर्शक ठरेल: डॉ. कमलादेवी आवटे

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे मा. संचालक राहुल रेखावार यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता नववी ते बारावीसाठी शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण लोणावळा येथे संपन्न झाला.

शिक्षकांसाठी 'क्षमता वृध्दी प्रशिक्षण'  दिशा दर्शक ठरेल: डॉ. कमलादेवी आवटे

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

 राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे   (Council of Educational Research and Training) संचालक राहुल रेखावार (Rahul Rekhawar) यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता नववी ते बारावीसाठी शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण (Teacher Capacity Training) शिबीर लोणावळा येथे संपन्न झाले. या कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी उपसंचालक डॉ. कमलादेवी आवटे (Dr. Kamaladevi Awate) यांनी आपले विचार व्यक्त केले. यावेळी बोलताना ते म्हणाले, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांसाठी क्षमता वृद्धी प्रशिक्षण दिशा दर्शक ठरेल. नवीन शैक्षणिक धोरण, २०२० (New Education Policy २०२०) च्या अनुषंगाने शिक्षण प्रक्रियेत चालू असलेले बदल व धोरणात नमूद  सर्व शिक्षकांसाठी दरवर्षी ५० तासिका स्वतःचा सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास (सीपीडी) करण्यासाठी प्रशिक्षण घेणे  गरजेचे आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले केले. 

शिक्षक क्षमता वृध्दी प्रशिक्षणात १२ विषयांचा समावेश होता त्यामध्ये, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०, एनसीएफ क्रॉस कटिंग, कुमारवयीन मुलांचे भाव विश्व उलगडताना, क्षमता आधारित मूल्यांकन व शाळा स्तर मूल्यांकन माहिती तंत्रज्ञानाचा शिक्षणातील उपयोग, कृती संशोधन व नवोपक्रम अनुभवजन्य  व खेळधारित अध्यापनशास्त्र, 21 व्या शतकातील कौशल्य व भविष्यवेधी शिक्षण, व्यवसाय मार्गदर्शन व समुपदेशन, NAS अहवाल विश्लेषण, प्रभावी शैक्षणिक नेतृत्व यांसारखे विषय होते. 

परिषदेचे मा. संचालक, सहसंचालक, उपसंचालक व सर्व अधिकारी यांच्या वतीने सर्व प्रशिक्षणार्थी यांना शुभेच्छा देण्यात आल्या. चार दिवसीय निवासी प्रशिक्षणासाठी संपूर्ण राज्यभरातून सुमारे ३६० प्रशिक्षणार्थी  व ३६ सुलभक उपस्थित होते यांची राहण्याची व जेवणाची उत्तम सुविधा उपलब्ध करून दिली त्याबद्दल परिषदेच्या वतीने सिंहगड संस्थेचे विशेष आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनिल आदिक यांनी केले, तर दत्तात्रय थिटे यांनी आभार मानले.