CISCE 10 वी, 12 वी बोर्डाचे निकाल जाहीर; दोन्ही वर्गात मुलींचा बोलबाला

दहावीमध्ये ९९.६५ टक्के मुली आणि ९९.३१ टक्के मुले उत्तीर्ण झाले आहेत. त्याचप्रमाणे 12वीमध्ये 98.92 टक्के मुली आणि 97.53 टक्के मुले यशस्वी झाली आहेत.

CISCE 10 वी, 12 वी बोर्डाचे निकाल जाहीर; दोन्ही वर्गात मुलींचा बोलबाला

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन्स (CISCE) द्वारे ICSE (10 वी) आणि ISC (12 वी) चे निकाल काही वेळापूर्वी जाहीर (Results announced)करण्यात आले आहेत. cisce.org या अधिकृत वेबसाईट वरून विद्यार्थी आपला निकाल तपासू शकतात. इयत्ता 10 वी मध्ये 99.47 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर 12 वी मध्ये 98.19 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

मागील वर्षाप्रमाणे यंदा सुध्दा आयसीएसई आणि आयएससी या दोन्ही वर्गांमध्ये मुलींनी बाजी मारली आहे. दहावीमध्ये ९९.६५ टक्के मुली आणि ९९.३१ टक्के मुले उत्तीर्ण झाले आहेत. त्याचप्रमाणे 12वीमध्ये 98.92 टक्के मुली आणि 97.53 टक्के मुले यशस्वी झाली आहेत.

 CISCE 10वी म्हणजेच ICSE बोर्डाच्या परीक्षेत 99.47 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यावर्षी  2,43,617 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती आणि त्यापैकी 2,42,328 उत्तीर्ण झाल्याचे घोषित करण्यात आले आहे. तसेच सीआयएससीईने जाहीर केलेल्या ISC 12वी च्या परीक्षेत  ९८.१९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यावेळी  परीक्षेला 99,901 विद्यार्थी बसले होते आणि त्यापैकी 98,088 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.