PHD ADNISSION: विद्यापीठ पीएचडी प्रवेशासाठी पेट परीक्षा घेणार; आठवड्याभरात निर्णय 

पुणे विद्यापीठासह राज्यातील इतरही विद्यापीठे सुध्दा पीएच.डी.प्रवेश पूर्व परीक्षा घेण्याच्या तयारीत आहेत.त्यामुळे जून महिन्यात होणाऱ्या नेट परीक्षेपूर्वी पेट परीक्षेसाठी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू केली जाऊ शकते.

PHD ADNISSION: विद्यापीठ पीएचडी प्रवेशासाठी पेट परीक्षा घेणार; आठवड्याभरात निर्णय 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) पीएच.डी.प्रवेशासाठी नेट परीक्षेचे गुण (NET Exam Marks for Admission to Ph.D)ग्राह्य धारण्याबाबत नुकताच निर्णय घेतला आहे.तसेच पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना सुध्दा पीएच.डी साठी प्रवेश घेण्याबाबत काही नियमांच्या अधिणाराहून मुभा दिली आहे.त्यामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे (Savitribai Phule Pune University)पीएच.डी.प्रवेशासाठी पेट परीक्षा (PET EXAMINATION FOR  Ph.D ADMISSION)घ्यावी किंवा घेऊ नये, याबाबत संभ्रम निर्माण झाला होता.त्यावर युजीसीकडे सुध्दा याबाबत पत्रव्यवहार करण्यात आला होता.मात्र,युजीसीकडून कोणतेही लेखी उत्तर मिळत नसल्याने अखेर वाटपाहून विद्यापीठाने पेट परीक्षा घेण्याबाबत सकारात्मक हालचाली सुरू केल्या असून येत्या आठवड्याभरात विद्यापीठाकडून पीएच.डी.प्रवेश पूर्व परीक्षेबाबत निर्णय घेतला जाईल,असे विद्यापीठाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या अधिकाऱ्यांबरोबर राज्यातील सर्व विद्यापीठाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक नुकतीच पर पडली.त्यात विद्यापीठांनी पेट परीक्षा घ्यावी किंवा घेऊ नये, याबाबत युजीसीला स्पष्ट विचारण्यात आले.त्यावर विद्यापीठांना पेट परीक्षा घेता येईल,असे युजीसीचे काही अधिकारी तोंडी सांगत आहेत.मात्र,लेखी स्वरूपात काहीही निर्देश देत नाहीत .त्यामुळे राज्यातील सर्वच विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे.मात्र, पुणे विद्यापीठासह राज्यातील इतरही विद्यापीठे सुध्दा पीएच.डी.प्रवेश पूर्व परीक्षा घेण्याच्या तयारीत आहेत.त्यामुळे जून महिन्यात होणाऱ्या नेट परीक्षेपूर्वी पेट परीक्षेसाठी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू केली जाऊ शकते.

महाराष्ट्रासह देशभरातील विद्यार्थी पुणे विद्यापीठाकडून पीएच.डी.प्रवेश प्रक्रिया केव्हा घेतली जाणार याच्या प्रतीक्षेत आहेत.गेल्या दोन महिन्यांपासून परीक्षा घेण्याबाबत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे अडथळा येत आहे.मात्र, येत्या आठवड्याभरात त्यावर तोडगा काढला जाणार आहे.परिणामी विद्यार्थ्यांची पीएच.डी. प्रवेशाची प्रतीक्षा लवकरच संपणाऱ आहे.