राज्य अभ्यासक्रम आराखडा तयार ; 29 फेब्रुवारी पर्यंत नोंदवता येणार अभिप्राय

शिक्षक, पालक, विद्यार्थी, क्षेत्रीय अधिकारी, तज्ञ नागरी यांची अभ्यासक्रम आराखडा विषयीची मते अभिप्राय व सूचना जाणून घेण्यात येणार आहेत.

राज्य अभ्यासक्रम आराखडा तयार ; 29 फेब्रुवारी पर्यंत नोंदवता येणार अभिप्राय

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीच्या पार्श्वभूमीवर (National Curriculum Framework ) नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क - स्कूल एज्युकेशनचा (NCF- SE)अभ्यास करून (State Curriculum Framework) स्टेट करक्युलम फ्रेमवर्क- स्कूल एज्युकेशन (SCF-SE) तयार करण्यात आला असून त्यात आवश्यक बदल करून त्याला अंतिम स्वरूप दिले जाणार आहे. यावरील अभिप्राय येत्या 29 फेब्रुवारीपर्यंत स्वीकारले जाणार आहेत. शिक्षक,  पालक, विद्यार्थी, क्षेत्रीय अधिकारी, तज्ञ नागरिकांनी आपल्या सूचना व अभिप्राय नोंदवावेत, असे आवाहन राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या सहसंचालक डॉ. शोभा खंदारे (Dr. Shobha Khandare)यांनी केले आहे.

एनईपी अंमलबजावणीच्या पार्श्वभूमीवर राज्य अभ्यासक्रम आराखडा -शालेय शिक्षण तयार करण्यात आला असून त्याबाबतचे अभिप्राय स्वीकारले जात आहे. भाषा, गणित, विज्ञान, कला, शारीरिक शिक्षण, समाजशास्त्र व आंतरविद्याशाखीय शिक्षण, त्याचप्रमाणे व्यावसायिक शिक्षण, शालेय संस्कृती व प्रक्रिया सहाय्यभूती प्रणाली तसेच अंतरसमय क्षेत्र याबाबतचे अभिप्राय 9 फेब्रुवारी ते 29 फेब्रुवारी पर्यंत नोंदवता येणार आहेत.

राज्य अभ्यासक्रम आराखडा निर्मिती प्रक्रियेचा भाग म्हणून क्षेत्रीय स्तरावरील परिस्थिती व त्या अनुषंगाने करता येणारे बदल याबाबत अभ्यास करण्यासाठी शिक्षक, पालक, विद्यार्थी, क्षेत्रीय अधिकारी, तज्ञ नागरी यांची अभ्यासक्रम आराखडा विषयीची मते अभिप्राय व सूचना जाणून घेण्यात येणार आहेत.तरी संबंधितांनी याबाबतचे अभिप्राय विषयनिहाय दिलेल्या लिंकवर नोंदवावेत,असे आवाहन करण्यात आले आहे.

-------------------------

राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण अभिप्राय नोंदाविणेसाठी LINK


१. आंतरसमवाय क्षेत्र- Cross Cutting Theme - https://forms.gle/caabDKvr1561aRzZ8


२. भाषा, गणित, विज्ञान, कला, शारीरिक शिक्षण, सामाजिक शास्त्र व आंतरविद्याशाखीय शिक्षण- Interdisciplinary Education- https://forms.gle/NMz8v37FEWppСтебА


३. व्यावसायिक शिक्षण- Vocational Education - https://forms.gle/g97HDFgbsx982CcK7


४. शालेय संस्कृती व प्रक्रिया, सहाय्यभूत प्रणाली- School Culture and Supportive Ecosystem- https://forms.gle/DasUYLCXfLfFhMTUA