UPSC जिओ सायंटिस्ट परीक्षा 2024 साठी मुलाखतीचे वेळापत्रक प्रसिद्ध! 

आयोगाने प्रसिद्ध केलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे की, 'उमेदवारांना वाटप करण्यात आलेल्या व्यक्तिमत्व चाचणीची (मुलाखत) तारीख आणि वेळ बदलण्याची कोणतीही विनंती मान्य केली जाणार नाही. 

UPSC जिओ सायंटिस्ट परीक्षा 2024 साठी मुलाखतीचे वेळापत्रक प्रसिद्ध! 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

UPSC ने (Union Public Service Commission) एकत्रित-जिओ सायंटिस्ट परीक्षा 2024 साठी मुलाखतीचे वेळापत्रक प्रसिद्ध (Interview schedule for Combined-Geo Scientist Exam 2024 released) केले आहे. हे वेळापत्रक अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर प्रसिद्ध करण्यात आले आहे. 
केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) प्रसिद्ध केलेल्या अधिकृत माहितीनुसार, भू-वैज्ञानिक परीक्षा 2024 च्या मुलाखती 9 डिसेंबर पासून सुरू होऊन 12 डिसेंबर 2024 पर्यंत चालतील.
पर्सनॅलिटी टेस्टचे ई-समन्स लेटर लवकरच अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध होतील. ते upsc.gov.in वर उपलब्ध करून दिले जाईल. उमेदवार आवश्यक तपशील प्रविष्ट करून हे लेटर डाउनलोड करू शकतील. आयोगाने प्रसिद्ध केलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे की, 'उमेदवारांना वाटप करण्यात आलेल्या व्यक्तिमत्व चाचणीची (मुलाखत)  तारीख आणि वेळ बदलण्याची कोणतीही विनंती मान्य केली जाणार नाही. 

वेळापत्रक डाउनलोड करण्यासाठी सर्वप्रथम उमेदवाराला upsc.gov.in अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. आता यानंतर तुम्ही होम पेजवर दिलेल्या मुलाखत टॅबवर क्लिक करा. यानंतर तुम्हाला नवीन पेजवर “Geo-Scientist (Mains) Examination 2024 Interview Schedule” वर क्लिक करावे लागेल. आता तुमच्या स्क्रीनवर एक PDF फाईल उघडेल. आता तुम्ही शेड्यूल तपासू आणि डाउनलोड करू शकता.
18 फेब्रुवारी 2024 रोजी UPSC संयुक्त भू-वैज्ञानिक प्रिलिम्स परीक्षा घेण्यात आली होती. त्यानंतर 22 आणि 23 जून 2024 रोजी मुख्य परीक्षा झाली. संयुक्त भू-वैज्ञानिक मुख्य परीक्षा, 2024 चा निकाल 14 ऑगस्ट रोजी जाहीर झाला आहे. आता मुलाखती घेतल्या जात आहेत. या परीक्षेशी संबंधित अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.