कॅनरा बँक अंतर्गत ३ हजार पदांसाठी २१ सप्टेंबरपासून अर्ज प्रक्रिया सुरू

उमेदवारांना 21 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर या कालावधीत ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत . इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत संकेतस्थळ www.canarabank.com वर जाऊन अर्ज करू शकतात. 

कॅनरा बँक अंतर्गत ३ हजार पदांसाठी २१ सप्टेंबरपासून अर्ज प्रक्रिया सुरू

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

कॅनरा बँकेत शिकाऊ पदांसाठी भरती (Canara Bank Recruitment) प्रक्रिया राबवण्यात येत आहेत. त्यासंबंधितीची अधिसूचना प्रसिद्ध (Notification released) करण्यात आली आहे. प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार, शिकाऊ उमेदवारांची 3 हजार रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. कॅनरा बँकेत शिकाऊ पदांसाठी भरतीसाठी (Recruitment for Apprentice Posts) ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. उमेदवारांना 21 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर या कालावधीत ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत . इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत संकेतस्थळ www.canarabank.com वर जाऊन अर्ज करू शकतात. 

बँक अप्रेंटिस पदांच्या भरतीसाठी अर्जदारांचे किमान वय २० वर्षे  असणे आवश्यक आहे. तर कमाल वय 28 वर्षे निश्चित करण्यात आले आहे. 1 सप्टेंबर 2024 पासून वयाची गणना केली जाईल. सरकारी नियमांनुसार, आरक्षित प्रवर्गातील अर्जदारांना वयोमर्यादेत विशेष सवलत देण्याची तरतूद करण्यात आली आहे.  त्यामुळे, अर्जदाराने अर्जासोबत वयोमर्यादा सिद्ध करणारी आवश्यक कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.

कॅनरा बँक अप्रेंटिस पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची शैक्षणिक पात्रता पदवी पास ठेवण्यात आली आहे. कोणत्याही मान्यताप्राप्त संस्था किंवा विद्यापीठातून पदवीधर पदवी असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. 

अर्ज कसा करायचा

सर्व प्रथम कॅनरा बँकेचे अधिकृत वेबसाइट  www.canarabank.com  वर जा. त्यानंतर recruitment वर क्लिक करा. तेथे अधिसूचना देण्यात आली असून त्यात दिलेली माहिती तपासा. त्यानंतर Apply Online वर क्लिक करा. त्यानंतर संबंधित कागदपत्र अपलोड करा. अर्ज पूर्णपणे भरल्यानंतर जमा करा आणि भविष्यातील वापरासाठी प्रिंट आउट घ्या.