हवाई दलाच्या सामायिक प्रवेश परीक्षेचे हॉल तिकिट प्रसिद्ध ; 9 ऑगस्टपासून परीक्षा सुरू

एअर फोर्स कॉमन ॲडमिशन टेस्ट (एएफसीएटी) मध्ये सहभागी होण्यासाठी (AFCAT प्रवेशपत्र 2024) प्रसिद्ध केले आहे. प्रवेशपत्रे आज, बुधवार, 24 जुलै रोजी सकाळी 11 वाजता प्रसिद्ध केले आहेत. 

हवाई दलाच्या सामायिक प्रवेश परीक्षेचे हॉल तिकिट प्रसिद्ध ; 9 ऑगस्टपासून परीक्षा सुरू

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

AFCAT 02/2024 साठी अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. भारतीय हवाई दल (IAF) ने जुलै 2025 मध्ये सुरू होणाऱ्या फ्लाइंग ब्रँच, ग्राउंड ड्युटी (Flying Branch, Ground Duty) (तांत्रिक आणि गैर-तांत्रिक) शाखा आणि NCC स्पेशल एंट्री बॅचमध्ये भरतीसाठी घेण्यात येणारी एअर फोर्स कॉमन ॲडमिशन टेस्ट (एएफसीएटी) मध्ये सहभागी होण्यासाठी (AFCAT प्रवेशपत्र 2024) प्रसिद्ध केले आहे. हॉल तिकीट  बुधवारी (दि.24 जुलै ) सकाळी 11 वाजता प्रसिद्ध करण्यात आले आहे. 

IAF ने अधिसूचनेत AFCAT 02/2024 च्या परीक्षांची तारीख जाहीर केली. अधिसूचनेनुसार परीक्षा 9 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट या कालावधीत होणार आहे. परीक्षा तीनही तारखांना प्रत्येकी 2 तासांच्या दोन शिफ्टमध्ये घेण्यात येईल. जी सकाळी 10 आणि दुपारी 3 वाजता सुरू होईल. उमेदवारांनी दिलेल्या शिफ्टच्या नियोजित वेळेच्या २ तास आधी त्यांच्या परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे. उमेदवार परीक्षेशी संबंधित सूचना प्रसिद्ध केलेल्या  हॉल तिकीट (IAF AFCAT Admit Card 2024) मध्ये पाहू शकतात.

असे करा डाऊनलोड प्रवेशपत्र

ज्या उमेदवारांनी IAF च्या AFCAT 02/2024 साठी नोंदणी केली आहे. त्यांनी प्रवेश परीक्षेला बसण्यासाठी तुमचे हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी afcat.cdac.in या अधिकृत पोर्टलला भेट द्यावी. त्यानंतर उमेदवार होम पेजवर दिलेल्या लिंकवरून किंवा खाली दिलेल्या थेट लिंकवरून डाउनलोड पेजवर जाऊ शकतात. या पृष्ठावर, उमेदवारांना त्यांच्या नोंदणीकृत ईमेल आयडी आणि पासवर्ड तपशीलांसह लॉग इन करावे लागेल. लॉग इन केल्यानंतर, उमेदवार त्यांचे प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतील.