बी.फार्मसी प्रवेश प्रक्रिया लांबली; नोंदणीला पुन्हा मुदतवाढ, विद्यार्थी-पालकांमध्ये नाराजी

शैक्षणिक वर्ष २०२५-२६ करिता अनेक अभ्यासक्रमांच्या प्रवेशप्रक्रिया अंतिम टप्प्यात आल्या आहेत. विशेषतः पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशाच्या साधारणतः तीन फेऱ्यांची प्रक्रिया पूर्ण होत आहे. दुसरीकडे औषधनिर्माणशास्त्र शाखेच्या अभ्यासक्रमांचा गोंधळ कायम आहे. गेल्या तीन वर्षांपासून विविध कारणांनी या अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची प्रक्रिया थेट डिसेंबरपर्यंत चालत असून, यामुळे विद्यार्थ्यांची अतोनात हानी होत आहे.

बी.फार्मसी प्रवेश प्रक्रिया लांबली; नोंदणीला पुन्हा मुदतवाढ, विद्यार्थी-पालकांमध्ये नाराजी

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (State Common Entrance Examination) कक्षामार्फत राबवण्यात येणाऱ्या औषधनिर्माणशास्त्र शाखेतील बी फार्मसी पदवी अभ्यासक्रमाच्या (B. Pharmacy Degree Course) प्रवेश नोंदणीला पुन्हा एकदा मुदतवाढ (Extension of admission registration) दिल्याने विद्यार्थी आणि पालकांमध्ये नाराजीचा सूर उमटताना दिसत आहे. इतर विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशाच्या तीन फेऱ्या पूर्ण झालेल्या असताना बी. फार्मसीच्या प्रवेशाला मुहूर्त लागलेला नाही. नव्या मुदत वाढीनंतर आता विद्यार्थ्यांना २ सप्टेंबरपर्यंत नोंदणी अर्ज भरता येणार (Registration applications can be submitted until September 2nd) आहे.

आयुष अभ्यासक्रमासाठी अडचण ठरणारी १२ वी गुणांची अट रद्द, ६ सप्टेंबर रोजी गुणवत्ता यादी

शैक्षणिक वर्ष २०२५-२६ करिता अनेक अभ्यासक्रमांच्या प्रवेशप्रक्रिया अंतिम टप्प्यात आल्या आहेत. विशेषतः पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशाच्या साधारणतः तीन फेऱ्यांची प्रक्रिया पूर्ण होत आहे. दुसरीकडे औषधनिर्माणशास्त्र शाखेच्या अभ्यासक्रमांचा गोंधळ कायम आहे. गेल्या तीन वर्षांपासून विविध कारणांनी या अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची प्रक्रिया थेट डिसेंबरपर्यंत चालत असून, यामुळे विद्यार्थ्यांची अतोनात हानी होत आहे.

वारंवार मुदत देताना ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात नोंदणी मुदत संपुष्टात आली होती. यानंतर सीईटी सेलने गुणवत्तायादी जाहीर करण्यासंदर्भात संभाव्य तारखांची घोषणा देखील केली होती. मात्र,प्रवेश वेळापत्रकामध्ये पुन्हा सुधारणा करताना नोंदणीला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. आता सुधारित वेळापत्रकानुसार मंगळवार २ सप्टेंबरपर्यंत विद्यार्थ्यांना नोंदणी करता येणार आहे. जर या वेळापत्रकात बदल केला गेला नाही, तर ६ सप्टेंबरला तात्पुरती गुणवत्तायादी प्रसिद्ध होईल. ७ ते ९ सप्टेंबरदरम्यान हरकती नोंदविण्यास मुदत असेल व १२ सप्टेंबरला अंतिम गुणवत्तायादी प्रसिद्धीचे नियोजन आहे.