आयुष अभ्यासक्रमासाठी अडचण ठरणारी १२ वी गुणांची अट रद्द, ६ सप्टेंबर रोजी गुणवत्ता यादी

आयुष अभ्यासक्रमांसाठी अर्ज केलेल्या सर्व विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी ६ सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात येईल. ८ सप्टेंबर ते १० सप्टेंबर सायंकाळी ६ वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना आयुर्वेद, होमिओपॅथी आणि युनानी या अभ्यासक्रमांसाठी महाविद्यालयांचा प्राधान्यक्रम देता येईल. आयुर्वेद, होमिओपॅथी आणि युनानी या अभ्यासक्रमांसाठी पहिल्या फेरीचा निकाल १२ सप्टेंबर रोजी घोषित करण्यात येईल.

आयुष अभ्यासक्रमासाठी अडचण ठरणारी १२ वी गुणांची अट रद्द, ६ सप्टेंबर रोजी गुणवत्ता यादी

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. 'आयुष'च्या आयुर्वेद, होमिओपॅथी आणि युनानी अभ्यासक्रमांच्या (Ayurveda, Homeopathy and Unani Courses प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना सर्वात जास्त अडचण ठरणारी १२ वी मधील गुणांची अट रद्द (Condition of marks in 12th class abolished) करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आयुष अभ्यासक्रमासाठी बारावीतील भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र या तीन विषयांत ३०० पैकी किमान १५० गुण आवश्यक असल्याची अट यापूर्वी होती. मात्र, आता ही अट काढून टाकल्याने विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठीचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यानुसार ६ सप्टेंबर रोजी गुणवत्ता यादी जाहीर (Merit list announced on September 6th) करण्यात येणार आहे. 

'पॉवर ग्रिड लिमिटेड'मध्ये विविध पदांच्या १५४३ जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू

नव्या नियमानुसार आता भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र या तीन विषयांत केवळ उत्तीर्ण असले तरीही 'आयुष'च्या आयुर्वेद, होमिओपॅथी आणि युनानी अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार आहे. आयुष मंत्रालयाने यासंबंधी पत्र सर्व राज्यांना पाठविले आहे. सीईटी सेलने सर्वच अभ्यासक्रमांसाठी २३ जुलै ते ४ ऑगस्ट या कालावधीत नोंदणी प्रक्रिया, तसेच एमबीबीएस व बीडीएस या अभ्यासक्रमांसाठी पहिली प्रक्रिया पार पडली. मात्र, आता वरील आदेशामुळे ज्या विद्यार्थ्यांनी आयुष अभ्यासक्रमांसाठी आधी अर्ज केला नव्हता, अशा विद्यार्थ्यासाठी १ ते ४ सप्टेंबर या कालावधीत नव्याने अर्ज करण्यासाठी संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.