'SCERT'कडून शैक्षणिक वेळापत्रक जाहीर; १० वीच्या परीक्षा फेब्रुवारीत तर पहिली ते नववीच्या एप्रिलमध्ये
गेल्या शैक्षणिक वर्षात इयत्ता पहिली ते नववीच्या परीक्षा आणि संकलित मूल्यमापन चाचणीचे वेळापत्रक आयत्या वेळी बदलल्यामुळे टीकेचे धनी ठरलेल्या एससीईआरटीने यंदा सावध भुमिका घेतली आहे. एससीईआरटीने जाहीर केलेल्या शैक्षणिक वेळापत्रकात पहिली ते दहावीच्या परीक्षांचा कालावधी आखून दिला आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी) शैक्षणिक वर्षाचे वेळापत्रक जाहीर (Academic year schedule announced) केले आहे. एससीईआरटी जाहीर करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार, इयत्ता दहावी बोर्डाच्या परीक्षा फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात सुरू होईल. तर, पहिली ते नववीच्या परीक्षा एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात (Dates of 1st to 10th exams) होणार आहेत. यापूर्वी वेळापत्रक बदलल्याने गोंधळ झाला होता. त्यामुळे यंदा 'एससीईआरटी'ने सावध भूमिका घेतली आहे. परीक्षा वेळेवर होऊन विद्यार्थ्यांना फायदा होईल, अशी अपेक्षा एससीईआरटीकडून व्यक्त करण्यात आली आहे.
CET Cell 2025 : बी फार्मसी प्रवेश नोंदणीला पुन्हा मुदतवाढ; विद्यार्थी, पालकांमध्ये नाराजीचा सूर
गेल्या शैक्षणिक वर्षात इयत्ता पहिली ते नववीच्या परीक्षा आणि संकलित मूल्यमापन चाचणीचे वेळापत्रक आयत्या वेळी बदलल्यामुळे टीकेचे धनी ठरलेल्या एससीईआरटीने यंदा सावध भुमिका घेतली आहे. एससीईआरटीने जाहीर केलेल्या शैक्षणिक वेळापत्रकात पहिली ते दहावीच्या परीक्षांचा कालावधी आखून दिला आहे. या वेळापत्रकानुसार राज्य माध्यमिक शालांत मंडळाच्या म्हणजेच दहावीच्या परीक्षा फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात सुरू होणार आहेत. तर इयत्ता पहिली ते नववीच्या परीक्षा गेल्या वर्षीप्रमाणेच एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात नियोजित करण्यात आल्या आहेत.
पहिली ते नववीच्या परीक्षांचे नियोजन करण्याचे अधिकार आतापर्यंत प्रत्येक शाळेतील मुख्याध्यापकांना होते. त्यामुळे वार्षिक परीक्षेचे नियोजनही मुख्याध्यापक आपापल्या शाळांच्या वेळापत्रकानुसार करत होते. मात्र, यामुळे शैक्षणिक दिवस वाया जात असल्याचे कारण देत एससीईआरटीने गेल्या वर्षी आयत्या वेळी म्हणजेच मार्च महिन्यात राज्यातील सर्व शाळांच्या वार्षिक परीक्षा तसेच संकलित मूल्यमापन चाचणी म्हणजेच पॅटचे वेळापत्रक जाहीर केले. या वेळापत्रकानुसार या परीक्षा २५ एप्रिलपर्यंत नियोजित होत्या. त्यामुळे शिक्षकांना उत्तरपत्रिका तपासून निकाल जाहीर करण्यासाठी फक्त पाच दिवस हाती होते. या निर्णयावर पालक, शिक्षक, शिक्षणतज्ज्ञ, शिक्षणसंस्था या सर्व पातळ्यांवर टीका होऊनही एससीईआरटीने आपला निर्णय पुढे रेटला. त्यामुळे आता तरी शिक्षक संघटना एससीईआरटीने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार १ ली ते ९ वीच्या परीक्षा घेणार का हे पाहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.
eduvarta@gmail.com