UBI बँकेकडून सहाय्यक व्यवस्थापक पदासाठी अर्जप्रक्रिया सुरू 

युनियन बँक ऑफ इंडियाने क्रेडिट आणि आयटी क्षेत्रासाठी असिस्टंट मॅनेजर सरकारी नोकरीसाठी ही रिक्त जागा जाहीर केली आहे. एकूण 500 पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे.

UBI बँकेकडून सहाय्यक व्यवस्थापक पदासाठी अर्जप्रक्रिया सुरू 
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 
जर तुम्हाला सरकारी बँकेत उत्तम अधिकारी दर्जाची नोकरी करायची असेल, तर युनियन बँक ऑफ इंडिया (Union Bank of India) UBI ने तुमच्यासाठी एक नवीन भरती जाहीर केली आहे. बँकेने सहाय्यक व्यवस्थापक पदासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. (The bank has invited applications for the post of Assistant Manager) या भरतीसाठी, इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन (IBPS) ने त्यांच्या अधिकृत वेबसाइट ibpsonline.ibps.in वर 30 एप्रिलपासून अर्ज मागवण्यास सुरुवात केली आहे. अर्ज करण्यासाठी  शेवटची तारीख २० मे निश्चित करण्यात आली आहे. 

युनियन बँक ऑफ इंडियाने क्रेडिट आणि आयटी क्षेत्रासाठी असिस्टंट मॅनेजर सरकारी नोकरीसाठी ही रिक्त जागा जाहीर केली आहे. एकूण 500 पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे.  

बँकेत असिस्टंट मॅनेजर (आयटी) पदासाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवारांकडे संगणक विज्ञान अभियांत्रिकी/आयटी/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स आणि संगणक विज्ञान/इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार/डेटा विज्ञान/मशीन लर्निंग आणि एआय/सायबर सुरक्षा या विषयात बी.ई./बी.टेक/एमसीए/एम.एससी (आयटी)/एमएस/एम.टेक पदवी असणे आवश्यक आहे.

तसेच, असिस्टंट मॅनेजर क्रेडिट पदासाठी उमेदवारांनी कोणत्याही विषयात पदवी किंवा CA/CMA/ICWA/CS किंवा पूर्णवेळ MBA/MMS/PGDM/PGDBM फायनान्स पदवी किमान 60% गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 

या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारचे  किमान वय २२ वर्षे आणि कमाल वय ३० वर्षे असावे. लेखी परीक्षेद्वारे उमेदवारांची निवड केली जाईल. अनारक्षित/ओबीसी/ईडब्ल्यूएस श्रेणीतील उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून १ हजार  १८० रुपये भरावे लागतील. तर एससी/एसटी/पीएच उमेदवारांना १७७ रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल.