विद्यापीठातील हॉकी मैदानाचे भूमिपूजन

sppu university , hockey , vc, Sunil mane,

विद्यापीठातील हॉकी मैदानाचे भूमिपूजन

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (sppu ) खाशाबा जाधव क्रीडा संकुल येथील हॉकी मैदानाचे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.कारभारी काळे यांच्या हस्ते गुरुवारी भूमिपूजन करण्यात आले. 

या भूमीपूजनाला विद्यापीठाचे प्र- कुलगुरू डॉ.संजीव सोनवणे, कुलसचिव डॉ.प्रफुल्ल पवार, वित्त व लेखा अधिकारी सीए चारुशीला गायके, अधिष्ठाता व क्रीडा संचालक डॉ.दीपक माने, कार्यकारी अभियंता विजय ढवळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. 

यावेळी डॉ.काळे म्हणाले, या मैदानाचे काम लवकरात लवकर पूर्ण होऊन येथे जागतिक दर्जाचे खेळाडू या संकुलात तयार व्हावेत. 

डॉ.माने म्हणाले, खाशाबा जाधव क्रीडा संकुलात या निमित्ताने नवी सुविधा निर्माण झाली असून हे अस्ट्रोटर्फ मैदान विद्यार्थ्यांना येत्या काही दिवसांत उपलब्ध होणार आहे. 


----