शिक्षक भरतीनंतर नोकरी टिकवण्यासाठी आणखी एक परीक्षा...

नोकरी टिकवण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथील इंग्रजी भाषेशी संबंधित प्रादेशिक विद्या प्राधिकरण या संस्थेच्या माध्यमातून घेतल्या जाणाऱ्या कौशल्य चाचणीमध्ये स्वतःला सिद्ध करावे लागणार आहे.

शिक्षक भरतीनंतर नोकरी टिकवण्यासाठी आणखी एक परीक्षा...

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

शिक्षक भरतीची (Teacher Recruitment)प्रक्रिया केव्हा सुरू होणार याबाबत पात्र उमेदवारांमध्ये मोठी उत्सुकता असताना आता आणखी एक नवीन निर्णय शिक्षकांसाठी लागू करण्यात आला आहे. सेमी इंग्रजी शाळांमध्ये शिक्षक (Teacher in Semi English Schools)म्हणून नियुक्त झालेल्या शिक्षकांना त्यांची नोकरी टिकवण्यासाठी छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar)येथील इंग्रजी भाषेशी संबंधित प्रादेशिक विद्या प्राधिकरण(Regional Institute of English)या संस्थेच्या माध्यमातून घेतल्या जाणाऱ्या कौशल्य चाचणीमध्ये स्वतःला सिद्ध करावे लागणार आहे.परिणामी नोकरी मिळाल्यानंतरही ती टिकवण्यासाठी शिक्षकांना आणखी एक परीक्षा(Another test for teachers)द्यावी लागणार आहे.

इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे महत्त्व गेल्या काही वर्षांपासून वाढत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे इंग्रजी माध्यमाच्या शाळांबरोबरच सेमी इंग्रजी माध्यमाच्या वर्गांमध्ये विद्यार्थी मोठ्या संख्येने प्रवेश घेत असल्याचे चित्र आहे. या विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांची नियुक्ती करण्याबाबत शासन आग्रही आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड होऊ नये म्हणून नियुक्त केलेल्या शिक्षकांची गुणवत्ता तपासली जाणार आहे. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगर येथील प्रादेशिक विद्या प्राधिकरणाच्या वतीने चाचणी परीक्षा घेण्यात येणार आहे. या चाचणीमध्ये संबंधित शिक्षकाचे कौशल्य / ज्ञान असमाधानकारक असल्यास त्याची सेवा समाप्त केली जाणार आहे.

हेही वाचा : शिक्षण शिक्षक भरती मोठी बातमी : ...तर त्या शिक्षण सेवकची सेवा होणार समाप्त

राज्यातील शिक्षक भरतीसाठी वेळोवेळी प्रसिद्ध झालेल्या शासन निर्णयानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मागणीप्रमाणे इंग्रजी माध्यमाचे शिक्षक उपलब्ध करून देण्याबाबत कळविण्यात आले आहे. त्यानुसार पवित्र पोर्टलवर सेमी इंग्रजी शाळांकरिता नोंदविण्यात येणाऱ्या मागणीस अनुसरून शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी मध्ये प्राप्त झालेल्या गुणांच्या आधारे इंग्रजी माध्यमातून व्यावसायिक पात्रता प्राप्त केलेल्या शिक्षकांमधून शिफारस केली जाणार आहे. केवळ या शिक्षकांनाच स्वतःला सिद्ध करण्यासाठी आणि स्वतःची नोकरी टिकवण्यासाठी आणखी एक परीक्षा द्यावी लागणार आहे.

--------------------------